सदस्य:Sneha Mhamal/धुळपाटी2
चंद्रकांत जाधव
‘चंद्रकांत जाधव’ हे गोव्यातील प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांचे ‘ ढगाआडचा चंद्र’ हे दलित आत्मचरित्र लोकप्रिय आहे. चंद्रकांत जाधव पेडणे तालुक्यात रहातात. त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. त्यांनी जरी हे एकच पुस्तक लिहिले असले तरी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन अशा अनेक चळवळींशी लेखकाचा संबंध आलेला आहे. त्यांच्या ह्या दलित आत्मचरित्राला अनेक पुरस्कार लाभले १९९७ मध्ये गोवा कला अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला.
प्रथम दर्शनीय जाणवले की गोव्यातील हे पहिलेच दलित आत्मकथन आहे, नुसते आत्मकथन नव्हे तर एका गुराख्याचे बालपणातील जीवघेणे असे अनुभव. चंद्रकांत जाधव यांनी आपल्या आत्मकथनास ‘ढगा आडचा चंद्र’ असे समर्पक नाव दिले. हा चंद्र नुसता ढगा आडचा नव्हे तर जातीयता, दारिद्र्य, कर्मकांड, विषमता ठायीठायी होणारा अपमान पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी पचवलेले हाल अशा अमावास्येच्या काळ्याकुट्ट रात्रीने या चंद्राला ग्रासून टाकलेले होते. चंद्राला स्वताचा प्रकाश नसतो म्हणतात. पण या चंद्राने हे वास्तव खोटे ठरविले आहे. आणि आपल्या अंत: करणातील स्वाभिमानाचे स्फुल्लिंग निर्माण करून स्वत:च स्वत:ची निर्भयतेने वाट चोखाळली आहे.
आयुष्याची ही वाट चोखाळतना त्यांना जगण्यासाठी झगडा द्यावा लागला. आज वर दलित लेखकांचे जे साहित्य प्रसिद्ध झाले ते किमान शिकलेले तरी होते. महाराष्ट्रातील फुले-आंबेडकरांची चळवळ कोंकण गोव्यात उशिराने पोहोचलेली दिसते. त्यामुळे शिक्षण घेऊ नये याकरिता घरातूनच विरोध झालेला. ‘स्वत:च्या आईनेच पहिल्याच दिवशी पाटी फोडली’ ह्या संदर्भात पहिल्याच प्रकरणात लेखक लिहितो.
चंद्रकांत जाधव यांनी सदतीस प्रकरणात स्फूट लेखनातून आपले आत्मकथन विषद केले आहे. प्रत्येक प्रकरण म्हणजे अंगावर तेजाब शिडकावे तसे वाचकांना हादरून टाकणारे अनुभव त्यात आहेत. आत्मकथनातील मनावर ठसा उमटवणारा भाग म्हणजे गोव्यातील जाती व्यवस्था, कर्मकांड, अंधश्रद्धा, तेथील संस्कृतिक जीवन याचे प्रथमच दर्शन मराठी वाचकाला होते. लहान वयात चंद्रकांतला वर्गात ‘श्रीगणेशा’ न शिकता गुरांच्या राखणेपणाचा ‘श्रीगणेशा’ शिकवा लागतो. सवर्णाच्या घरी गुरे रखण्यास चंद्रकांतला जावे लगे. तेथे आपल्या घरातून ताट न्यावे लागे. महार जातीत जन्माला आल्यामुळे अस्पृश्यतेचे विंचू लहान वयातच डसले. गुरे राखताना अनेक सवर्णाची घरे बदलावी लागली. प्रत्येक घराचे विपरीत अनुभव अनेकदा कुत्रा-मांजरीसारखी वागणूक त्यांच्या वाट्याला येत असे.
‘मेलेले ढोर हेच आमचे पक्वान्न’ असे एक प्रकरण आलेले आहे. दलितांचे जीवन हे किती भयंकर होते. मेलेल्या ढोरांचं मांस खाण असे हालखीचे दिवस महाराष्ट्रासारखेच गोव्यातही दलितांच्या वाट्याला यावे हे वाचून मन बिथरलं.
सन १९९४ साली लेखक धर्मदिक्षा भूमीला भेट देतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरचा एकही पुतळा गोव्यात नाही याने लेखक दुखावला जातो. मित्रांच्या सहकार्याने पेडणे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ते उभारतात. महारांनी ढोल वाजवण्याची प्रथा हे काम वर्षानुवर्षे महारालाच करावे लागते. देव बाहेर काढणे, अवसार येणे, देव वाटेला लावणे, पालखी काढणे, शिमगा, दसरा, लग्ने, अंतयात्रा ह्या सर्व कार्यक्रमाला महारानेच ढोल वाजवावा लागे. या प्रथेविरुद्ध असंतोष व्यक्त करणारा तरुण प्रथमच पुढे आला. ‘आम्हाला माणसासारखे वागावा’ ही जाणीव दलितात निर्माण केली. लेखकाने पाण्यासाठी केलेला संघर्ष त्यापाठीमागे आंबेडकरी विचाराची प्रेरणा होती हे सहज लक्षात येते.
या सर्व मानसिकतेचा परिणाम म्हणून की काय, लेखकाने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. बौद्ध धर्मा संबंधी भोवतालची मते नोंदवताना लेखक सांगतोय, ‘खेड्यापाड्यातील काही माणसे बौद्ध धर्म म्हणजे काही तरी भयानक आहे असे समजून दूर जातात आणि हा धर्म स्वीकारलेल्या लोकांना एक प्रकारे वाळीत टाकतात. शेवटी धर्मांतर.... त्यांनी मला नवीन जीवन दिले, अन्यथा माहरकी करत करत बरोबरीचे चित्र आपल्या आजोबा-पणजोबांच्या वाटेने जात आहेत तसे त्याच वाटेने मलाही जावे लागले असते आणि त्यामुळे माझ्याही आयुष्याचा चुराडा झाला असता.
व्यवसाय परिवर्तन हे आंबेडकरी चळवळीचे एक महत्वाचे सूत्र. महारकीच्या नरकातून आपली सुटका करावयाची असली तर नवा व्यवसाय सन्मानाचा असावा. आपल्यातील गुणांना वाव देणारा असावा. जाधवांचे हे स्वप्न साकार होण्याकरिता त्यांनी शिवणकामचा ध्यास घेतला. हे सर्व शिकत असताना अनेकदा त्यांचे खूप अपमान झाले. जेथे-तेथे ते टेलरिंग कामासाठी जात मग ते गोव्यातील मोठे शहर असले तरी ते महार असल्यामुळे त्यांना जेवण देण्यासाठी, घरात राहण्यासाठी कोणीच आसरा देत नसत. दलितांच्याच वस्तीत जावे लागे. लहानपणातही घरातून कुठेही जाताना ताट न्यावे लगायचे, पुढे तरुणपणातही जात आपला पिच्छा सोडत नाही ही व्यथा घेऊनच त्यांनी पुढे जीवनाचा नवा मार्ग शोधला आणि आज प्रतिष्ठितपणे माणूस म्हणून ते जगत आहेत.