भारतासारख्या देशात जिथली अर्धी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली व कोणत्याही  सुविधा नसलेल्या स्थितीत असताना आपण फ़क्त आपला स्वार्थ साधण्याच्या नादात त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये. या उलट ते या मुख्य प्रवाहात् कसे सामावले जातील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या जवळ असलेल्या गोष्टींचा इतरांनाही फ़ायदा मिलन्याची द्यावी ही भावना दुर्दैवाने आपल्यामधे कमी आहे. 1960 ते 75 पर्यंत लोकांचा सामान्य कल होता.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी शासनाची असावी,शासनाची त्याच्यावर देखभाल असावी. पण गेल्या वीसेक वर्षात आपल्याला अशी जाणिव झाली की शासन एकटे या सर्व गोष्टी देऊ शकणार नाही आणि त्यासाथि आपण पूर्णपणे शासनावर अवलंबून राहु शकणार नाही. ज्यांच्या जवळ साधन सुविधा आहेत त्यांनाही काही प्रमाणात या शिक्षनाची जबाबदारी उचालली पाहिजे.या जबाबदारीची जाणिव ईनामदारांना पुरेपूर आहे.

       वर्षानुवर्षे त्यांनी स्वत;ला या जबाबदारिचे पालन करण्याच्या कामात झोकुन दिले आहे.आणि सध्याचे त्यांचे भव्य क्याम्पस हे त्यांचे मूर्त स्वरुप आहे. ते नुसती स्वप्ने पाहात नाही तर वाटेत आलेल्या अनंत अडचनिंवर मात करून एक्तयाच्या बळावर शांतपणे  व चिकातीने संस्था निर्मान करतात.   

ईतरांनि केलेल्या सुचना ते तत्परतेने ऎकतात व आमलातही आणतात, हे इनामदारांच्या व्यक्तिमत्वाचे ठळक पैलू आहेत.