गुरुपरंपरा : वडील कै.माधव करंदीकर तसेच पं. रामदास पळसुले, पं. विकास दातार, पं. शशीकांत बेल्लारे, पं. दत्तात्रय भावे, पं. विवेक जोशी        

                  यांचे शिष्य श्री. संजय करंदीकर

* प्रथितयश तबला व ढोलकी वादक म्हणून १९९२ पासून  कार्यरत.

* आकाशवाणी व दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कलाकार.

* संस्थापक व संचालक : ‘स्वर-ताल साधना’ – संगीत शिक्षण संस्था, स्थापना १९९३.

* त्यांनी आजपर्यंत एक हजाराच्यावर देशी व परदेशी विद्यार्थ्यांना तबला-ढोलकीचे शिक्षण दिले आहे.

* अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या ‘संगीत अलंकार’ [तबला} परीक्षेमध्ये  २००३ साली संपूर्ण देशात  दुसरा क्रमांक.

* ‘इंडियन काऊन्सील फॉर कल्चरल रिलेशन्स’ (ICCR) तर्फे प्रदेशामध्ये शिक्षक व वादक म्हणून २००४ साली निवड.

* तबला, ढोलकी, तालवाद्यांची क्रमिक पुस्तकांची [दृक-श्राव्य माध्यमासह] निर्मिती.

* ‘स्वतंत्र वादन’, ‘ताल-वाद्य कचेरी’ ह्याबरोबरच विविध संगीत प्रकारांमधील मान्यवर कलाकारांबरोबर तबला-ढोलकीची साथसंगत करतात.

त्यापैकी काही मान्यवर पुढीलप्रमाणे :-

शास्त्रीय गायनामध्ये :- श्रीमती अलका मारुलकर, श्रीमती  मंजिरी आलेगावकर, पं.शौनक अभिषेकी, पं. आनंद भाटे, पं. विजय कोपरकर

नाट्य संगीतामध्ये :- श्रीमती जयमाला व किर्ती शिलेदार ,पं.राहुल देशपांडे यांचेबरोबर संगीत सौभद्र, स्वयंवर, कट्यार काळजात  घुसली इ. संगीत नाटकांना तबला साथ.

सुगम संगीतामध्ये :- संगीतकार पं. यशवंत देव, श्री. श्रीरंग उमराणी

लोकसंगीतामध्ये :- ह.भ.प. चारुदत्त आफळे [किर्तन] ,कै. शाहीर किसनराव हिंगे [पोवाडा], श्रीमती सुलोचना चव्हाण [लावणी]

* प्रादेशिक चित्रपट, लघुपट, टेलिव्हीजन सिरीयल्स इत्यादींच्या ध्वनी-चित्रमुद्रणात तालवाद्य वादनासाठी सहभाग.

* ‘नादयात्रा’ या तालवाद्यांची माहिती, स्वतंत्रवादन, जुगलबंदी व विविध संगीत प्रकारांबरोबरची त्यांची साथसंगत उलगडून दाखविणाऱ्या कार्यक्रमाची निर्मिती.

   याच विषयावरील इ. एम. आर. सी. [पुणे युनिव्हर्सिटी] तर्फे निर्मित मालिकेसाठी संहिता लेखन  व सादरीकरणामध्ये सहभाग. ‘नादयात्रा’ या मालिकेचे दूरदर्शनवरून प्रसारण.

*  भारतरत्न पं.भिमसेन जोशींचे शिष्य श्री. आनंद भाटे यांचे गायन साथीसाठी ‘अमेरीका दौरा’. तेथे १४ शहरांमध्ये १९ कार्यक्रम सादर केले. त्याचबरोबर तबला कार्यशाळा [वर्कशॉप्स्] घेतल्या. 

*  तबला कोष, तालवाद्य कोष तसेच ‘संगीत विश्व गुरुकुल’ आणि ‘सांगीतिक पर्यटन’ इ. विषयीचे काम चालू