सदस्य:Sachin jahagirdar/धूळपाटी/राममन्त्राचे श्लोक

राममन्त्राचे श्लोक संपादन

नको शास्त्र अभ्यास वित्पती मोठी|
जडे गर्व ताठा अभीमान पोटी||
कसा कोणता नेणवे आजपा रे|
हरे राम मंत्र सोपा जप रे||१||
  • अर्थ :-समर्थ अगदी तळमळीने सांगत आहेत कि "केवळ शुष्क शास्त्र अभ्यास व पांडित्य नको ,यामुळे मनात गर्व अहंकार निर्माण होतो .तसेच अजपा मंत्रजपाचे काहीच ज्ञान नाही.त्यामुळे अत्यंत सुलभ असा हरे राम हा मंत्र जप करा ."
नको कंठ शोषू बहू वेदपाठी|
नको तू पडू साधनाचे कपाटी||
घडे कर्म खोटे बहू तो दगा रे|
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे||२||
  • अर्थ :-अर्थ माहित नसताना वेदपाठाचा कंठशोष निरर्थक आहे.तसेच अन्य ध्यानादी साधने क्लिष्ट आहेत.शुद्ध कर्म होत नसल्याने कर्ममार्गात फसगत होण्याची शक्यता असते. त्यामुळे अत्यंत सुलभ असा हरे राम हा मंत्र जप करा .
तुला ही तनू मानवी प्राप्त झाली|
बहूजन्मपुण्ये फळालागी आली||
तिला तू कसा गोविसि विषयी रे|
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे||३||
  • अर्थ :-अनेक जन्मांचे पुण्य फळाला येऊन मानवाचे शरीर (नरदेह ) मिळाले आहे .ह्या दुर्लभ नरदेहाला विषय सुखांमध्ये का वाया घालवता? त्याऐवजी अत्यंत सुलभ असा हरे राम हा मंत्रजप करा .
जरी ही तनू रक्षिसी पुष्ट काही |
तरी भोग तो रोग होईल देही ||
विपत्तीपुढे ते न ये बोलता रे |
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||४||
  • अर्थ :आता शरीराचे कितीही पोषण केले तरी प्रारब्धाचे भोग काही सुटत नाहीत .त्यावेळी रोग होणारच.अशा संकटांच्या काळी माणूस काही काऊ शकत नाही..म्हणूनच अत्यंत सुलभ असा हरे राम ह्या सोप्या मंत्राचा जप करा .

...

खुळे हस्तपादाडी हे भग्न होती |
दिठी मंद होऊनिया कर्ण जाती ||
तनू कंप सर्वांगी होती कळा रे |
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||५||
  • अर्थ :हातपाय लुळे पडून मोडू शकतात .दृष्टी मंद होणे तसेच बहिरेपणा येऊ शकतो .वृद्धापकाळी शरीराला कंप सुटून अवकळा येईल.( याचे भान ठेवून) अत्यंत सुलभ असा हरे राम ह्या सोप्या मंत्राचा जप करा .
कफे कंठ हा रुद्ध होईल जेव्हा |
अकस्मात तो प्राण जाईल जेव्हा ||
तुला कोण तेथे सखे सोयरे रे |
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||६||
  • अर्थ :मृत्यूच्या वेळेला कफाने कंठ भरून येईल .अचानकपाने प्राण शरीरातून निघून जाईल .त्यावेळेला कोणीही सखे सोयरे सोबत येत नाहीत.म्हणूनच अत्यंत सुलभ असा हरे राम ह्या सोप्या मंत्राचा जप करा .
तुझे बाळ तारुण्य गेले निघोनी |
कळेना कसे लोक जाती मरोनी ||
करीसी मुलाची स्वहस्ते क्रिया रे |
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||७|
  • अर्थ :तुझे (साधकाचे )बालपण व तारुण्य संपले .माणसाना मरण कसे येते (किती लवकर ) हे कळेनासे झाले .(एक वेळ अशी येते कि )जन्माला घातलेल्या मुलाची अंतिम क्रिया वडिलाना करावी लागते . (याचे भान ठेवून) अत्यंत सुलभ असा हरे राम ह्या सोप्या मंत्राचा जप करा .
दुराशा नको रे परस्त्रीधनाची |
नको तू करू नीच सेवा जनाची ||
पराधीन कैसा मला दीससी रे |
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||८||
  • अर्थ : परस्त्री आणि परधनाची वासना मनामध्ये नको.तसेच लाचारपणे हीन माणसांची सेवाही करू नये .मला (समर्थांना) तू अगदी पराधीन असा दिसत आहेस.म्हणूनच अत्यंत सुलभ असा हरे राम ह्या सोप्या मंत्राचा जप करा .

मदे डोलसी बोलसी साधुवृंदा | कसे हीत तू नेणसी बुद्धिमंदा || रिकामाची तू गुंतशी वाउगा रे | हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||९

  • अर्थ :तू (भ्रांत व्यक्ती )मदोन्मत्त होवून साधुसंताना अपशब्द बोलतोस ,तुला तुझे हित काही कळत नाही.विनाकारणच अनेक व्यर्थ गोष्टींमध्ये तू गुंतून पडतोस (त्यापेक्षा) हरे राम ह्या सोप्या मंत्राचा जप करावा .

बहू व्यापसंताप तो मूळपापा | गतायुष्य द्रव्ये न ये कोटि बापा || कळेना तुला कोणता तो नफा रे | हरे राम हा मंत्र सोपा जपा रे |१०||

  • अर्थ :प्रपंचासाठी केलेले (अनैतिक )व्याप ,ताप हेच पापाचे मूळ होय .कितीही पैसा असेल तरी गेलेले आयुष्य परत येत नाही .असे असूनहि तुला कशामध्ये नफा (फायदा ,हित ) आहे हे कळत नाही. त्याऐवजी हरे राम ह्या सोप्या मंत्राचा जप करावा.

तुझे आप्त द्र्व्यार्थी नुस्तेची होती | तनू हे चितेमाजी की बोळवीती || असे जाणुनी हीत काही करा रे | हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||११||

  • अर्थ: तुझे सर्व सगे सोयरे केवळ पैशासाठी तुझ्याजवळ होते.मृत्युनंतर हेच लोक तुला चितेमध्ये जाळून टाकतात.हे तू जाणून घे काहीतरी हिताचा विचार कर . त्यासाठी हरे राम ह्या सोप्या मंत्राचा जप करावा.

कुटुंबी स्त्रिया पुत्र ते दासदासी |

बहू पोषिसी सोसुनी दुख्ररासी || त्यजी भार काबाड ओझे किती रे | हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||१२|

  • अर्थ :तू कुटुंबीय .पत्नी ,मुले ,,नोकर चाकर यांचे दु;खाचे डोंगर वाहून पोषण करतोस .हा व्यर्थ भार वाहने सोडून दे .त्याऐवजी हरे राम ह्या सोप्या मंत्राचा जप करावा.

बहू इच्छिसी कीर्ती सन्मान काही | सुखाचा तुला अंतरी लेश नाही || फुकाचे मुखी नाम ते का न ये रे | हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||१३|| अर्थ: आपल्याला कीर्ती ,सन्मान मिळावे अशी तुझी इच्छा आहे .परंतु मानसिक सौख्य काहीही नाही.असे असूनसुद्धा फुकट असणारे नाम सुद्धा तुझ्या तोंडात का येत नाही?आतातरी हरे राम ह्या सोप्या मंत्राचा जप करा. रविसूत ते दूत विक्राळ येती | तुझ्या लिंगदेहासी ओढूनी नेती | तुला खंडिती मुंडिति दंडिती रे || हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||१४ || अर्थ :मृत्युच्या वेळेला विक्राळ असे यमदूत तुझ्या लिंगदेहाला ओढून घेऊन जातील .तुझ्या त्या लिंगदेहाचे तुकडे करतील,मारतील ,शिक्षा करतील .आतातरी हरे राम ह्या सोप्या मंत्राचा जप करा. नको वीषयी फारसा मस्त होऊ | नको मानदंभामध्ये चित्त गोवू || नको भस्म लावू जटाभार का रे | हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||१५|| अर्थ :विषयांमध्ये फार रमू नकोस .तसेच दांभिक होवून मानापमानामध्ये चित्त अडकवू नको .अंगाला उगीच भस्म फासू नकोस आणि जटा तरी कशासाठी वाढवतोस.त्याऐवजी हरे राम ह्या सोप्या मंत्राचा जप करा. //जय जय रघुवीर समर्थ //

//जय जय रघुवीर समर्थ //