सदस्य:Rutuja dhole/s1
छत्रपती शाहू महाराज
शाहू महाराज यांचा जन्म इ .स २६ जून १८७४ रोजी कागल मध्ये घाटगे घराण्यात झाला . त्यांचे नाव यशवंत जयसिंग घाटगे होते . त्यांचे आईचे नाव राधाबाई होते. कोलापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १० वर्षीय यशवंत राव यांना दत्तक घेतले. त्यांचे नाव शाहू असे ठेवण्यात आले. छत्रपती राजश्री शाहू महाराज हे वयाच्या २० व्य वर्षी कोल्हापूर संस्थानाचे राजे झाले. राजश्री शाहू ,महाराज यांचे शिक्षण राजकोट व धारवाड येथे झाले. त्यांनी कोल्हापूर संस्थांना मध्ये प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी राजाज्ञा काढली.त्यांनी ६ जुलै १९०२ रोजी मागासवर्गीय यांना ५०% जागा राखीव केली . १९१७ साली यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहास मान्यता दिली. सामाजिक सुधारणा बरोबर शाहू ,महाराज यानी शेती व उद्योग धंद्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी १९४८ मध्ये कागल येथे जयसिंग राव यांनी पिण्याच्या पान्याच्या सोयीसाठी ७६ एक्कर २१ गुंठ्यात टाळावा ची बांधणी केली. शाहू महाराज यांनी सामाजिक कार्य बरोबरच संगीत , नाट्यकला , चित्रकला , मल्लविद्या , यान सारख्या कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. इ .स . १९०७ मध्ये ,महाराजांनी राधानगरी या धरणाच्या प्रकल्पाची योजना पुढे आणली. ९ फेब्रूवारी ,१९०८ ला गाव नव्याने वसवून त्या गावाचे नाव राधानगरी ठेवण्यात आले . आज ते महाराष्ट्रातील एक भक्कम धरण म्हणून ओळखले जाते . रोमच्या आखाड्याच्या धरती वर त्यांनी खासबाग हे कुस्ती चे मैदान बांधून कोल्हापूर हि मल्लविद्ये ची पंढरी केली. छत्रपती शाहू महाराजांचा आवडीचा छंंद शिकार करणे हा होता.अशा या थोर लोकराजा ,दलित पतितांचा उद्धारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज वयाच्या ४८ व्य वर्षी म्हणजे ६ मे १९२२ मुंबई येथे हृदयविकाराने मृत्यू झाला. https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/rajarshi-chhatrapati-shahu-maharaj-birth-anniversary/articleshow/69953902.cms