अवैध गर्भपात आणि मूत्यू प्रकरण : मुंडे दाम्पत्याला १० वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा

संपादन

[]परळी येथील ब्रून हत्या प्रक्रणातील आरोपी सुधाम मुंडे ,त्यांची पत्नी सरस्वती मुंडे आणि महादेव पाटेकर यांना बीड जिल्हा न्यायालयाने दोषी करार दिला. दोषींना न्यायालयाने दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठवली आहे. कलम ३०४ ,३१२ ,३१४,३१५,३१६ नुसार गुन्हा दाखल झाला होता.यामध्ये पिसिपिएनडीटी आणि एमटीबी कायद्यानुसार गुन्हा सिद्ध होऊन हे तिघेहि दोषी ठरले आहेत . गेल्या साडे सहा वर्षापासून सुधाम मुंडे कारागृहात असल्यानं तो काळ वजा करून उर्वरित शिक्षा त्याला भोगावी लागणार आहे .या प्रकरणात एकूण १७ आरोपी होते . परळी येते मुंडे हॉस्पिटल मध्ये मे २०१२ साली विजयमाला पटेकर या गर्भवती महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल होता .

त्यानंतर मुंडे हॉस्पिटल मध्ये सुरु असलेल्या अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान प्रकरण समोर आले होते . याच प्रकरणात न्यायालयाने या तिघांना दोषी करार दिला. त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे .या आरोपींपैकी एक असलेल्या जळगावचे डॉक्टर राहुल कोल्हे यांचा अपघाती मृत्यू झाला होता .

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने मुंडे दाम्पत्याचा परवाना कायमचा रद्ध केला होता .२०१० सालीही 'लेक लाडकी अभियान 'च्या प्रमुख Adv.वर्षा देशपांडे यांनी स्टिंग ऑपरेशन करून मुंडे दाम्पत्याच्या रुग्णालयात अवैध गर्भलिंग चाचणी आणि अवैध गर्भपात होत असल्याचे जगासमोर आणल होत . त्यानंतर महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी मुंडे हॉस्पिटलची तपासणी केली . त्यावेळी गर्भलिंग निदान चाचणीचे रेकॉर्ड ठेवले नसल्याचा गुन्हा दाखल झाला .यावेळी वेगवेगळ्या काल्मांखाली आठ गुन्हे मुंडे दाम्पत्यावर दाखल करण्यात आले होते . यापैकीच म्हणजे २०१० साली दाखल झालेल्या वेगवेगळ्या गुन्हांसाठी परळीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एल .जी .पाचे यांनी दोन्ही आरोपींना चार वर्षाची शिक्षा सुनावली होती .

उल्लेखनीय म्हणजे , सध्या डॉ.सुदाम मुंडे हे नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत तर त्यांच्या पत्नी सरस्वती मुंडे या जामिनावर बाहेर आहेत. आज २०१२ साली दाखल झालेल्या विजयमला पटेकर मृत्यू प्रकरणातही मुंडे दाम्पत्य आणि महादेव पटेकर हे तिघे दोषी ठरले .

मुंडेना शिक्षा लागली. या शिक्षेच्या निमित्ताने ले लाडकी अभियानाने महाराष्ट्रातल्या लेकी वाचवण्यासाठी हाती घेतलेले मिशन यशस्वी होत आहे .लेक लाडकी अभियान महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांना स्टिंग ऑपरेशन करून पकडण्याचे आपले मिशन भविष्यकाळात अधिक जोमाने सुरु ठेवणार आहे.

  1. ^ zeenews.india.com https://zeenews.india.com/marathi/tags/dr-sudam-munde.html. 2019-03-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)