स्वा.से.श्री.क.रा.इन्नानी महाविद्यालय,कारंजा(लाड)या महाविद्यालयात भौतिकशास्त्र विद्याशाका सन १९८३ या वर्षी सुरु झाली.सुरुवातीला हे महाविद्यालय,पांजरापोळ येथील जागेवर सुरु करण्यात आले.

त्या नंतर महाविद्यालय स्वतःच्या इमारतीत १९९७ साली सुरु झाले.सुरुवातीला महाविद्यालयात डॉ.जे.बी.ठाकरे हे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख म्हणून १९८३ साली रुजू झाले.त्यानंतर १९८४ साली

डॉ.डी.टी.डोंगरे व १९८९ साली डॉ.आर.ए.पाटील रुजू झालेत.सोबतच शिष्केतर कर्मचारी म्हणून श्री.संजय पुजारी,श्री.प्रदीप कुलकर्णी,श्री.गजानन इंगळे यांची नेमणूक करण्यात आली. सोबतच

PCM व इलेक्ट्रोनिक group हे सुरु करण्यात आले.भौतिकशास्त्र विभाग हा PMComp हा विभाग २००१ साली सुरु करण्यात आला. भौतिकशास्त्र प्रयोगशाळेचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा तर्फे

सन २०१४ साली Ph.D साठी नोंदणी करण्यात आली. आज रोजी एका विद्यार्थ्याचे Ph.D चे काम डॉ.जे.बी.ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.तसेच २०१८ साली भौतिकशास्त्र विभागात M.Sc.

(भौतिकशास्त्र) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा तर्फे मान्यता देऊन सुरु करण्यात आले.

आज रोजी भौतिकशास्त्र विभागात तीन कायमस्वरूपी प्राध्यापक व चार CHB प्राध्यापक काम करीत आहेत व तीन शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत्त.