सदस्य:QueerEcofeminist/संवादक
संवादक ही या संहितेत बदल करून तयार केलेली संहिता आहे या संहितेचा वापर करून तुम्ही कोणत्याही पानाच्या निर्मात्याला ताबडतोब संदेश पाठवू शकाल. हा संदेश त्या पानाचा उल्लेख विभाग मथळा म्हणून वापरून, संदेशाखाली आपली सही आपसूकच करेल. अगदी कमी काळात आणि कष्टात पानाच्या निर्मात्याला लागलीच संदेश पोहोचवता येईल. ही संहिता स्थापन केल्यावर आपल्याला प्रत्येक पानाच्या वर अधिक या विकल्पात "संवाद साधा" हे बटण दिसेल. ज्याचा वापर करून आपल्याला त्या विशिष्ट पानाच्या निर्मात्यास ताबडतोब संदेश पाठवणे शक्य होईल.
वापर
संपादन- या संहितेचा वापर करुन आपण पान तयार करणाऱ्या व्यक्तिला पानाच्या मजकूरात भर/सुधारणा/काही सुचना करू शकाल.
- पान तयार केल्याबद्दल, धन्यवाद/आपली मते देऊ शकाल.
- पानाच्या विषयाबद्दल संदर्भ/जास्तीची माहिती देऊ शकाल.
स्थापना
संपादन- मराठी विकिप्रकल्पांसाठी आपण खालील ओळ आपल्या कॉमन.js मध्ये जशीच्या तशी लिहा. आणि पानाची सय रिकामी करा.
.
mw.loader.load( "//mr.wikipedia.org/w/index.php?title=सदस्य:QueerEcofeminist/संवादक.js&action=raw&ctype=text/javascript" );
नोंद : या संहितेत झालेल्या गोंधळामुळे जर काही नुकसान झाल्यास, त्याची जबाबदारी ती वापरणाऱ्यावर असेल. ही संहिता वापरून जी काही संपादने तुम्ही कराल त्याचे कोणतेही श्रेय किंवा नुकसान झाल्यास त्याचे आरोप माझ्यावर केले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ही संहिता वापरताना काळजी घ्यावी.