नागांव

गाव - नागांव ता . करवीर जि . कोल्हापूर पिन कोड -४१६२०७

नागांव हे गाव करवीर तालुक्यामधील ५७ वे सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव आहे .कोल्हापुर जिल्हयामधील क्षेत्रफ़ळाच्या दृष्टीने ६१ व्या क्रमकाचे गाव आहे .कोल्हापूर शहरापासुन अवघ्या२३ कि.मी अंतरावर वसलेलं नागांव हे गाव . गावा मध्ये सांस्कृतिक सामाजिक वारसा असलेले हे गाव विविध परंपरेन नटलेले आहे गावामध्ये सांस्कृतिक उत्सव आनंदाने साजरे केले जातात . यात्रेच्या वेळी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. बिरदेव आनंदात साजरी केली जाते. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आनंदाने साजरे केले जातात. झाँजपथक आणि लेझीम हे पारंपरिक खेळ सुरुवातीपासून जोपासले आहेत. झाँजपथक आणि लेझीम हे खेळ खेळले जातात . दरवर्षी गावातील तरुण मंडळे गणेश विसर्जनानिमित्त झाँजपथक आणि लेझीम खेळतात . हि कला लहानांपासून वृद्धांपर्यंत जोपासली आहे. गावचे गृहस्थ अगदी आनंदाने सहभागी होतात. तर बिरदेव देवालयमध्ये धनगरी ढोल हा पारंपरिक ढोलवाद्य प्रकार खूप लोकप्रिय आहे. वेगवेगळ्या निमित्ताने विविध योजना आयोजित केल्या जातात, जसे कि रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य शिबीर स्वच्छता अभियान यामध्ये गावातील सर्व तरुण मंडळे सहभागी होतात.

लोकसख्या-(2010च्याजनगननेनुसार ) - २३६१ एकुणलोकसख्यात्यापैकी , १२०० पुरुष आणि स्त्रिया ११६१ नागांवमध्ये २३६१ लोक राहतात त्यापैकी १२०० पुरुष आणि स्त्रिया (महिला ) ११६१ संपुर्ण लोकसंख्येपैकी ८६ % सामान्यजाती (open ) आणि १४ % अनुसुचितजाती (SC) मधीलआहेत ६ वर्षाखालिल ११ % मुले आहेत त्यामध्ये ५६% मुले आणि ४४% मुली आहेत गावात एकुण ४७६कूटुंबे आहेत प्रत्येक कूटुंबात सरासरी ५ व्यक्ती आहेत .

लिंगगुन्नोतर - १००० पुरुष्यामागे ९६८ महिला आहेत साक्षारता - १५२४ लोक साक्षार आहेत त्यापैकी ८४१ पुरुष तर ६८३ महिला आहेत साक्षारतादर ७२% आहे क्षेत्रफ़ळ - 4कि.मी दुधगंगा नदी - बारमाही वाहणारी दुधगंगा नदी . गावची नदी दक्षिण भागातून जाते .

शैक्षणिक सुविधा विद्या मंदिर नागांव ( १ ली ते ७ वी ) माध्यमिक विद्यालय नागांव (८ वी ते १० वी )

https://pincode.net.in/416207