सदस्य:Pawar Raghunath/२०ऑगस्ट कार्यशाळा

पु .ज. बुवा

पुरुषोत्तम जनार्दन बुवा यांचा जन्म ३०जुलै १९२८रोजी सोलापुरात झाला . यांचे प्राथमिक शिक्षण हे सोलापुर नगरपालिकेच्या शाळा क्रमांक एक मध्ये झाले . आणि माध्यमिक शिक्षण हे हरीभाई देवकरण प्रशालेत झालं . त्याचे वडील त्याच्या वयाच्या नवव्या वर्षीच वारले .संचार चे संपादक रंगाअण्णा वैद्य हे त्याचे मावसभाऊ त्यांच वडील हे लहानपणीच वारल्यामुळे मामांच्या संस्कारांचा परिणाम म्हणून बुवा आणि रंगा वैद्य स्वातंत्रलढ्याशी जोडले गेले .

देश पारतंत्र्यात असताना, शाळेत शिकत असताना , बॉम्बचे पार्सल सोलापूरच्या रेल्वे स्टेशन वर गुप्तपणे घेऊन जाणारे , ज्याचे घर शुभराय मठ हे एक सामाजिक , राजकीय , आणि सांस्कृतिक चळवळीचे झालेले होते त्याचा दत्त चोकातील घरी , शुभराम मठ या ठिकाणी स्वातंत्र्यसैनिकाची उठबस असे .त्याचबरोबर महात्मा गांधीजींच्या 'हरिजन 'या पत्राचा त्याचावर प्रभाव होता.यातून प्रेरणा घेऊन त्यांनी इंग्रजीतील निघणारे बुलेटिन्सचे मराठीत भाषातर सुरु केले व त्याचे वितरण गुप्तपणे ते व त्याचे सह्करी करत असत .

स्वतंत्र मिळाल्यावर एक .व्रतस्थ पत्रकार म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित झालेले पुरषोत्तम जनार्देन बुवा याचं कार्य हे पत्रकारासाठी आदर्शवत मानलं. स्वातंत्र्य आंदोलनातसुरु केलेले पत्रकारीतीचे कार्य यांनी स्वातंत्र्यानंतर ही सुरु ठेवले . तरुण पत्रकारासाठी सोलापूरात पहिली कार्यशाळा आयोजित केली होती असे हे पत्रकार पु . ज . बुवा १५ मार्च १९९३ रोजी काळाच्या पडदयाआड गेले ...

संर्दभ संपादन

  1. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सोलापूरचे दीपस्तंभ
 प्रा . डॉ.श्रीकांत येळेगावकर