श्री क्षेत्र आदमापूर श्री क्षेत्र आदमापुर हे देवअवतारी बाळूमामा यांचे समाधीस्थान आहे. जे भारतात महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भुदरगड तालुका येथे आहे. देवअवतारी बाळूमामा यांच्या वास्तव्यात पावन असे हे जागृत स्थान आहे. जिथे येण्यासाठी अनेक मार्ग आहेत रेल्वेने आल्यास कोल्हापुर स्टेशन वर येऊन कोल्हापूर मुरगुड एसटीने आदमापुर येथे येऊ शकतो. तसेच निपाणी राधानगरी,कोल्हापूर राधानगरी या एसटीने ही येथे येऊ शकतो.श्री क्षेत्र आदमापूर हे बाळूमामांच्या भक्तांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे. आदमापुर येथे भक्तांसाठी भव्य वाहनतळ आहे. तसेच भक्तांच्या राहण्यासाठी भव्य व सुसज्ज असे भक्तीनिवास उभारण्यात आले आहे.तसेच सद्गुरु संत बाळूमामा ट्रस्ट या नावाने रुग्णालय ही चालवले जाते. मंदिराच्या बाजूला झाडे व बगीचा आहे. श्री क्षेत्र आदमापूर येथे येताच सर्वप्रथम मंदिरच्या कळसाचे दर्शन होते.मंदिराचा कळस कलात्मक आहे. त्यानंतर भव्य अशा महाद्वाराचे दर्शन होते. हे महाद्वार चाळीस फुट इतके उंच आहे. महाद्वारातून आत येताच काही अधिकृत विक्री केंद्रे आहेत. त्यानंतर दृष्टीस भव्य पिंपळ वृक्ष पडतो.या पिंपळवृक्षाचे वैशिष्ट्य हे की त्याच्या एका खोडातून पाच फांद्या आहेत. त्यानंतर उंच व कलात्मक अशी दीपमाळ दिसते. श्री क्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामा यांचे समाधी मंदिर हे संगमरवर या दगडाने उभारण्यात आले आहे. शुभ्र अशा संगमरवर आणि कलात्मक नक्षीदार असे भव्य मंदिर आहे मंदिर परिसरात जाताच भक्तांचे मन प्रसन्न होते.समाधी मंदिरामध्ये जाताच संत बाळूमामा यांच्या मुर्तीचे दर्शन मिळते. मधोमध संत बाळुमामा ची मूर्ती त्यांच्या उजव्या बाजूला बाळूमामांचे गुरु मुळी महाराजांची मूर्ती डाव्या बाजूला श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची मूर्ती आहे.त्या मंदिराची देखभाल श्री बाळूमामा ट्रस्ट करते,तसेच बाळूमामाच्या मेंढ्याची संख्या आता लाखांवर गेली आहे. ती मंदिर ट्रस्टच्या देखरेखीखाली आहेत. श्री बाळूमामा यांनी आपला बहुतेक वेळ मुख्य मंदिराजवळ (चालना योग्य अंतर असलेल्या) मरगुबाई मंदिरात घालविला. श्री बाळूमामा यांच्या वयाच्या 74 व्या वर्षी आदमापुर येथे निधन झाले.श्री क्षेत्र आदमापूर येथे महाराष्ट्र कर्नाटक तसेच अनेक राज्यातून भक्तगण बाळूमामांचे दर्शन घेण्यासाठी येतात.https://www.thespiritualindian.com/balumama-temple-saint-balumama-temple/