विवेक मुकुंद मणेरिकर ‘.--

विवेक मणेरीकर

विवेक मुकुंद मणेरिकर हे अडवलपाल  बिचोली येथे रहातात.

त्यानी सरकारी महाविद्यालय कला, शास्त्र आणि वाणिज्य, सांखळी येथे बि.ए पूर्ण केल आणि नंतर D.Ed करुन, ITI मध्ये COPA केला.

त्यांना चित्रकला, हस्तकला, वाचन, कविता लेखन, निबंध लेखन, फिरणे, सुलेखन करणे असे विविध छंद आहेत.

त्यांना शिक्षणाची खुप आवड आहे, परंतु आर्थिक अडचणींमुळे त्यांना ते घेता आलं नाही.

त्यांच्या बद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल जाणून घेण्यासाठी मी त्यांना काही प्रश्न विचारले, त्यांच्या उत्तरातुन त्यांची ‘ कला असुनही एक प्रसिद्ध नसलेला साहित्यिक’ अशी ओळख पटली.

मुलाखतिच्या वेळी त्यांना काही प्रश्न विचारले गेलेत, ते पुढील प्रमाणे आहेत:-

1)    सर, तुम्ही साहित्याच्या नेमक्या कोणकोणत्या घटकाबद्दल प्रामुख्याने लिहितात?

उत्तर:- मी वृत्तपत्रासाठी लेख लिहितो. परंतु कविता लेखन हा आवडीचा विषय आहे.त्यातुन आपल्या भावना मांडू शकतो.

2)    तुम्हाला लेखन करण्याची प्रेरणा व आवड कोणाकडून मिळाली ?

उत्तर:- मी महाविद्यालयात शिकत असताना, तिथले शिक्षक श्री. राजेंद्र केरकर यांचं लिखाण मी वाचत आलो आहे, त्यांच्या लेखणीतुन प्रेरित होऊन आपणही काही लिहावं, आपणही व्यक्त व्हावं असं सतत वाटे. त्यासाठी मला प्रेरीत करणा-या व्यक्ति आहेत सौ. पोर्णिमा केरकर.

त्यांच्याच कडून मला कविता लेखनाची प्रेरणा मिळाली.

3)    तुमच लेखन नेमक कश्यावर आधारित असतं?

उत्तर:- मी ज्या कविता,निबंध, लेख लिहितो त्यांचे विषय हे व्यक्तिशी, भोवतालच्या परिसराशी, अशेच असततात.  वास्तविक घटना, वास्तविकतेशी मी जास्त लिहितो.तसेच काल्पनिक, सामाजिक हे विषय घेऊनही मी कविता लिहितो.

4)    तुमच्या एखाद्या कलाकृतीचा थोडक्यात परिचय करुन द्या?

उत्तर:- मी एक कविता लिहिली होती माझ्या आजीवर. ‘ अशीच होती माझी आजी’ ही कविता “यशवंत” या त्रैमासिकामध्ये प्रकाशित झाली.त्या कवितेत मी माझ्या आजीचा स्वभाव,आजीची मुक्या प्राण्यांवर असलेली माया, आपुलकी,जिव्हाळा या सा-यांच एक चित्र या कवितेमध्ये रेखाटलं आहे.

तसच D.Edची इंटनशिप चालू असताना मी एक नाटक लिहिल, त्यामध्ये मी सामाजिक, राजकिय, अशा विविषयावर भाष्य करणारं हे नाटक आहे.

5)    या शिवाय तुमचं प्रकाशित झालेल कोणतं साहित्य आहे?

उत्तर:- काही गोष्टी प्रकाशित झाल्या नाहीतं कारण मिच पुढाकार घेतला नाही, मला पुढे करणारे मित्र मिळाले नाही, आणि आर्थिक परिस्थिति पण हालाखिची होती या सर्व कारणांमुळे मला माझं सहित्य प्रकाशित करता आलं नाही.

6)    लहान मुलाना साहित्याचा उपयोग कसा होतो?

उत्तर:- साहित्यामुळे लहान मुलांच्या कल्पकतेत वाढ होते. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त इतर कविता, कथामुळे शिक्षक एखादा मुद्दा विद्यार्थ्यापर्यंत चांगल्या त-हेने पोहचवु शकतो आणि लहान मुलांनही ते आवडतं.त्यांच्या सृजनात्मकते बरोबर त्यांच्या बुद्धिमत्तेतही वाढ होते.

यामुळे मुलानांही मराठी विषयाबद्द्ल आणि साहित्याबद्द्ल आवड निर्माण होईल.

·      विवेक मुकुंद मणेरिकर हे मराठी बरोबर हिंदितही लेखन करतात.