देविदास गांवकर

२००१  साली  देविदास गावकर खोतिगाव सरकारी माध्यमिक शाळेत नववीत शिकत होतो, त्यावेळी शाळेतर्फे  एक मासिक काढायचे ठरवले होते आणि त्यासाठी त्यांनी एक कविता लिहिली होती ती त्याच्या आयुष्यातील पहिली कविता होती.त्यनंतर उच्च – माध्यमिक विद्यालयात गेला तेव्हा वेगवेगळ्या कार्यक्रमात किंवा खास करून कँम्पमध्ये गेल्यावर वेळ घालवण्यासाठी म्हणून गितं लिहायचो.पण वृत्तपत्रामध्ये गीते,कविता किंवा अन्य काही प्रकाशित झालेले असते ते कसे काय लिहितात? ह्याचे कोडे त्याला पडलेले असे.

       खोतिगावातील एका क्लबच्या कार्यक्रमात एक दिवस पत्रकारिता या विषयावर सोयरू वेळीप यांचे व्याख्यान होते आणि नवोदित लेखकांसाठी हे व्याख्यान आहे असा सूर खोतिगाव पसरलेला होता त्यामुळे तो त्या दिवशी त्या व्याख्यानाला गेलो आणि पत्रकार सोयरू वेळीप ह्यांना कार्यक्रमात भेटलो व आम्ही लिहिल्यास वृत्तपत्रात छापतील का? असा प्रश्न त्यांनी त्याला केला तेव्हा ते म्हणाले की आपल्यासारख्या माणसासाठीच ही वृत्तपत्रे असतात. तरी पण कसे लिहायचे ? हेच त्याला समजले नव्हते. तेव्हा त्यानी आपण आपल्या गावातील चांगल्या वाईट घटनांविषयी लिहू शकतो असे सांगितले, आणि आपण काम करत असलेल्या वृत्तपत्र कार्यालयाचा पत्ता त्याला दिला. तो लगेच दुस-या दिवशी एक निबंधासारखे पत्रक लिहून त्याच्या पत्यावर पाठवले आणि पाठवलेल्या तीन चार दिवसानी लिहिलेले नावासहित वृत्तपत्रावर छापून आले आणि ते वृत्तपत्र होते सुनापरान्त त्याचे लिखाण वृत्तपत्रावर छापून आले असल्याने त्याला एवढा आनंद झाला होता की तो सांगू शकत नव्हतो आणि त्यानंतर सातत्याने गावातील विविध अडचणीवर तो पत्रे लिहू लागला.त्यामुळे काहीजणांशी ओळखीही वाढू लागल्या. हीच पत्रे दैनिक तरूण भारत वृत्तपत्रात छापावी अशी इच्छा झाली.

       त्यानंतर गोव्यात दैनिक लोकमत वृत्तपत्र सुरू झाले तेव्हा त्याने तरूण भारत मधून लोकमतमध्ये प्रवेश केला. त्याने लिहिलेल्या बातम्या खेडोपाड्यातील आणि विशेष होत्या त्यामुळे लोकमत वृत्तपत्रात हँलो गोवा नावाच्या पुरवणीत जास्त प्रसिद्ध व्हायच्या.त्यामुळे समाजात त्याच्याविषयी वेगळा ठसा निर्माण करू शकलो.

       त्याच्या लिखाणाचे पुस्तक स्वरूप व्हावे किंवा त्याचे पुस्तक छापून यावे असा विचार त्याच्या मनात कधीही आला नाही.त्याचे उच्चमाध्यमिक विद्यालयातले शिक्षण कवींद्र फळदेसाई हे त्याला सतत सांगायचे की तुमच्याकडे लिहिण्याची शक्ती आहे कला आहे आणि विशेष, माहितीही आहे तरी पण पुस्तकस्वरूपात का लिहीत नाही?

       पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण त्याने खोतिगावांतील सरकारी माध्यमिक शाळेत मराठीतूनच घेतले. दहावीनंतर सत्यवती सोयरू उच्च माध्यमिक विद्यालय माशें – काणकोण विद्यालयांत तेव्हा जास्त विषय इंग्रजीत असल्याने त्याच्या वाट्याला भाषेचा मोठा अडथळा आला. आणि त्याचबरोबर घरातील गरीबीमुळे विद्यालयात ये – जा करण्यासाठी सहा – सात रूपये मिळणे अशक्य असल्याने तो मानसिकरित्या खचलो आणि शेवटी शाळा सोडण्याची पाळी त्याच्यावर आली पण वाचनाची आवड असल्याने एकदा तीन रूपये देऊन आणलेले वृत्तपत्र त्याने ते संपेपर्यंत दिवसाला पान ह्या प्रमाणे वाचत असे पाहून घरची आणि शेजारची मंडळी त्याला वेडा वगैरे म्हणून उलट – सुलट नावे ठेवायचे. त्याचबरोबर त्याला सामाजिक कार्याची आवड असल्याने त्याची ओळख सेबी राँड्रिग्ज या सामाजिक युवा कार्यकर्त्याशी झाली आणि त्याच्याकडून गोव्याची संस्कृती आणि समस्या ह्याची बरीच जाणीव झाली व त्याचबरोबर  प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करताना त्याची सखोल माहिती आणि रणनीतीत्मक माहिती गोळा करण्याची वेगळी दृष्टी मिळाली आणि तेही त्याला सतत सांगायचे की वाचन करत रहा.