सदस्य:Komal Vinay jadhav anish धुळपाटी

कुटुंबाचे लोकशाहीकरण आणि पुरुषच्या वर्तणूक बदलानंतरच स्त्रियांवरील हिंसा थांबेल आणि बाबासाहेबांना अपेक्षत राज्यघटनेने मान्य केलेली समता घराघरात प्रस्थापीत होईल. म्हंणून कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा -२००५ची प्रभावील अंमलबजावणी होणे अत्यावश्क आहे.

आपल्याला माहित आहे का ?

  • स्त्रीयांवरील हिंसेच्या संदभात महाराष्ट्रचा क्रमांक चोथा आहे.
  • स्त्रीयांवरहिंसाचार मोठ्या प्रमाणात होत असतो, अश्या एकूण गुन्ह्यांपेकी कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण४१.१२ टक्के एवढे आहे.

कौटुंबिक हिंसा म्हणजे काय?

"कुटुंबातील एका व्यक्तीकडून कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला मिळणारी वाईट वागणूक व होणारा शारिरीक, मानसिक छळ म्हणजेच कौटुंबिक हिंसा."

कौटुंबिक हिंसेबाबत आधिक माहिती

  • कौटुंबिक हिंसा महिला व मुलांवर जास्त प्रमाणात होते.
  • महिलांवर व मुलींवर होणारी हिंसा जास्त गंभिर स्वरुपाची असते.
  • कौटुंबिक हिंसा गरीब-श्रीमंत, शिक्षित- अशिक्षित, सर्व जाती- धर्म व सर्व वयोगटातील व्यक्तींच्या बाबतीत घडू शकते.
  • कौटुंबिक हिंसा घरातील चार भिंतीत तसेच घराबाहेर सुद्धा होते.
  • कौटुंबिक हिंसा शारीरिक, मानसिक,लैगिक , आर्थिक, सामाजिक इ. स्वरूपात होते.
  • व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच अधिकार गाजवण्यासाठी हिंसेचा वापर केला जातो.
  • कौटुंबिक हिंसेमुळे हिंसाग्रत व्यक्तीचे शारीरिक व मानसिक स्वास्थ बिघडते, परिणामी जीवही धोक्यात येतो.
  • कौटुंबिक हिंसेचा वाईट परिणाम कुटुंबातील सर्वच व्यक्तीवर , मुख्यत्वे मुलांवर होतो.
  • कौटुंबिक हिंसा हि खाजगी बाब नसून ती समाजिक समस्या आहे.

योग्य प्रयत्न केल्यास कौटुंबिक हिंसा थांबवता येते.

माझ्याबाबतीत हिंसा होते हे मी कसे ओळखायचे ?

  1. माझ्यावर सतत टीका केली जाते का ?
  2. माझी इतराबरोबर तुलना केली जाते का ?
  3. माझ्या शिक्षणाचा उद्धार केला जातो का ?
  4. माझा व ;माझ्या जवळच्या व्यक्तीचा अपमान केला जातो का ?
  5. मला शिवीगाळ होते का ? व मला उदेशून अपशब्द वापरले जातात का ?
  6. मला एकटे पाडले जाते का ?
  7. माझ्याशी अबोला ठेवला जातो का ?
  8. महत्वाच्या विषयांच्या निर्णय प्रक्रीयेत माझे मत घेतले जात नाही का ?
  9. घरातल्या सगळ्या समस्यासाठी मला जबाबदार धरले जाते का ?
  10. इजा करून घेन्याचील किंवा करण्याची , जीव देण्याची किंवा जीव घेण्याची धमकी मला दिली जाते का ?
  11. मला घराबाहेर काढण्याची /घटस्फोटाची धमकी दिली जाते का ?
  12. माझ्या पाल्काआक्डून मला लग्नासाठी जबरदस्ती केली जाते का ?
  13. मी काय बोलावे , कोणाशी बोलावे , कुठे जावे हे इतर ठरवतात का ?
  14. मला माझ्या मुळापासून तोडले जाते का ?
  15. मला मित्र मैत्रिणी/ शेजारी , माहेरी यांच्याशी संबंध ठेवू दिला जात नाही का ?
  16. माझा इतरासमोरही अपमान केला जातो का ?
  17. मला नोकरी करण्यासाठी किंवा अर्थाजन करण्यासाठी विरोध केला जातो का ?
  18. माझ्याकडे सतत पैशाची मागणी केली जाते का ?
  19. माझे पैसे जबरदस्तीकाढून घेतले जाते का ?
  20. मी पैसा कसा व कुठ वापरयचा हे ठरवण्याचे स्वातंत्र्यदिले जाते का ?
  21. मला प्रत्येक पैशाच हिशोब मागितला जातो का ?
  22. माझ्यापासून कुटुंबाचे सर्व आर्थिक व्यवहार लपवूनठेवलेजातात का ?
  23. मला शारीरिक इजा होईल असे वर्तन करतात का ? उदा .मारणे , केस ओधने , ढकलणे , चिमटे घेणे,लाथा मारणे, डोके आपटणे, गळा दाबणे इ.
  24. मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे का ?
  25. मला माझ्या इच्छेविरूद्ध लैगिक संबंधठेवण्यास