कधी पंखातला रंग मी

कधी पंखातला रंग मी

कधी फुलातला सुगंध मी

कधी पावसाची सर मी

कधी उन्हातील धग मी

कधी रंगात रंगलेला मी

कधी असाच बेरंग मी

कधी सावलीची आस मी

कधी उन्हाचा भास मी

कधी मनातील गीत मी

कधी नभातील प्रित मी

कवी अवी (लातुर महाराष्ट्र 9623787288 )


       

एक अधुर प्रेम... सोनवी   भाग  1

तुझ्याविना ना गंध आहे

ना कोणताही छंद आहे

तुझ्याविना एकटाच मी

मैफिलीत या एकांत आहे

    कदाचित तीला माहीत नसेलही आपण याच दिवशी भेटलो होतो. किती अल्पक्षणात संपलं हे वर्ष. मला आजही आठवतं मकरसंक्रांतीचा तो दिवस होता सोनेरी दिवसाची चाहुल कदाचित सुंदर क्षणांनी आज सजणार होती. कधी नव्हे ती कॉलेजमध्ये जाण्याची ओढ लागली होती. जणु घरट्यातील चिमणी चिमणास साद घालतं होती. चिमणा बेभान होऊन गीत गावा अशी माझी मनस्थिती झाली होती. ऐव्हाना कॉलेजला पोहचलो सगळीकडे तीळगुळ वाटपाचा मनसोक्त आनंदोत्सव सुरू होता. मित्र-मैत्रीणी, प्रियकर-प्रियसी एकमेकांना तीळगूळ देण्यात मग्न होती. गुलाबाची कळी फुलता फुलेना आणी माझ्या नयनांना ती पाहता दिसेना अशी म्हणण्याची वेळ माझ्यावर आली होती खुप शोधलं तीला पण ती दिवसभर दिसलीच नाही. ऐरवी ती तीच्या मैत्रिणीसोबत फिरताना दिसायची. कधी माझ्या मागं तर कधी पुढे दिसायची. किती पहावं तिच्याकडे एकटक डोळ्यानी पाहून पाहुन डोळ्यासमोर आणी डोळ्यातही तीच सामावलेले होती. ऐवढी खास होती ती शुभ्र चाफा फुलावा तसं तीच सौंदर्य होतं. कदाचित ऐवढी सुंदर मुलगी माझ्या आयुष्यात कधी आली नव्हती. ती जेव्हा चालायची तेव्हा तीच्या नाजुक हरणासारख्या पायाकडे बघतचं राहावं असं वाटायचं. तीच आवडतं पांढऱ्या रंगाचे टिशर्ट तीला अधिकच सुंदर दिसायचं. कधी कधी ती मोकळे केस ठेवायची तीच्या मानेभोवती पसरलेले केस पाहताना माझा श्वास खालीवर व्हायचा. तिला पहिल्यावेळी मी ग्राउंडवर पाहिलं होतं.रविवार होता त्या दिवशी दुपारी जेवणानंतर ती ग्राउंडवर खेळताना दिसली. त्यावेळी तिने पाढऱ्या रंगाचा टि शर्ट घातला होता. बॉलमागे टुनटुन उड्या मारत ती धावत होती. त्याच वेळी मला ती आवडली होती. कदाचित तिने मला त्यावेळी पाहिलं नसेल पण मी मात्र तीला डोळेभरुन पाहिले होते. पण ती मला बोलेल असं स्वप्नातही वाटलं नव्हते. रात्री रिडींगला मला स्पष्ट दिसेल अशा जागी ती बसायची. ती अधुनमधून चोरून पहायची तसं मीही तीला पहायचं पण अजून बोलायचं बाकी राहीलं होतं. तसं अचानक तिचं रिडींगला येणं वाढलं होतं.एके दिवशी रात्री मेसमध्ये ती जरा जास्तीच माझ्याकडे बघतं होती. असं अनैसर्गिक मला कदाचित याआधी कोणी पाहिलं नव्हतं. मी मात्र बैचेन होऊन तीला बोलण्याची वाट पाहत होतो. थोड्यावेळाने ती परत मेस मध्ये आली. आता मात्र मला रहावतं नव्हतं क्षणाचाही विलंब न करता तीला बोलायचं ठरवलं पण तेवढ्यात तीची मैत्रीण पाठीमागून तिच्यासोबत आली. आणी नेहमीप्रमाणे आजही तीला बोलायचं राहीलं. त्या दिवशी मी सुविचार लिहायला मुद्दामचं उशीर करत होतो. ती माझ्यासमोर बसून एकटक माझ्याकडे पाहत होती कदाचित कवी अवी नाव तिला फारच आवडतं असावं. थोड्यावेळाने ती पाणी घेऊन निघून गेली असंख्य प्रश्न माझ्यासमोर ठेवून.

   

                न पाहताच कोणी

                खुप काही पाहुन गेले

                न बोलताच कोणी

                खुप काही बोलुन गेले

   कॉलेजमध्ये स्नेहसंमेलन दोनतीन दिवसानंतर सुरु होणार होतं. आणी मला त्या आधी तिला बोलायचं होतं कारण नंतर दोनतीन दिवस तिची भेट होणे शक्य नव्हते. रात्रीच्या रीडिंगही  परवा पासुन बंद राहणार होती. आज मकरसंक्रांती असल्यानमुळे तिला भेटण्यासाठी फार मोठी संधी चालुन आली होती. आज काहीही झालं तरी त्या सुंदरतेला साद घालायची हे मनाशी पक्क ठरवलं. तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणी दिवसभर शुभेच्छानी मन भरून आलं होतं. सर्वांनी तिळगुळ दिले पण मला तीच्या तिळांची ओढ लागली होती. कुठे होती ती सकाळी कॉलेज आणी मेसमध्ये दिसली नाही. भिती वाटतं होती ती गावी गेली तर नसेल. नेहमीप्रमाणे रात्रीच्या रिडींग जात होतो. आमची रिडींग तिसऱ्या मजल्यावर होती. दुसऱ्या मजल्यावर मुलीची रिडींग असल्याने वर जाताना नियमित ती बसलेली दिसायची. आजही ती बसलेली होती. पांढऱ्या टि शर्ट तिने घातला होता. केस मोकळे आणी अर्ध्यापर्यंत पुढे आलेले होते. ती बसायची ऐटीत. तिला पाहून जीवात जीव आला. अभ्यास करण्याची आज मानसिकता उरलेली नव्हती. कधी एकदाचे अकरा वाजतात की असं झालं होतं. पण वेळ काही जात नव्हती. पाणी पिण्यासाठी म्हणून परत ऐक वेळी खाली येत होतो. तेव्हाही तिने माझ्याकडे पाहिलं.एकदाचे अकरा वाजले. सगळे खाली जात होतो मी मुद्दामहुन शेवटी जाण्याचं ठरवलं. मी बाहेर पडल्याशिवाय ती ही जायची नाही. हळूहळू एक एक पायरी उतरतं होतो. तिही बॅग सावरुन बसलेली होती. मी पुढेपुढे चालत होती तीच्या पायांचा आवाज ऐकु येत होता. चारपाच पायऱ्या ती मागे होती. मी अचानक जागीच थांबलो मी थांबलेलं पाहुन तिही थांबली. खिशात हात घालुन तिळगूळ तिच्यासमोर धरून म्हणालो हे घे तिळगुळ खा. आणी तिने तिळगुळ घेतले. इकडे माझे भान राहीले नव्हते. ऐवढ्या दिवसांनी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण होत होतं. मला थांबवतं ती म्हणाली. थांब मी पण देणार तुला तिळगुळ. तिने प्लॅस्टिकच्या डबीतुन छानशा रेवड्या काढल्या आणी दोन रेवड्या माझ्यासमोर धरून म्हणाली हे घे तिळगुळ. त्यावेळी झालेला आनंदोत्सव शब्दांत व्यक्त करु शकत नाही. मी एक रेवडी पटकन खाऊन टाकली आणी दुसरी ती नको म्हणतं असताना तीला भरवली. तिच्या निरागस चेहऱ्यावर कसलीही शंका दिसतं नव्हती. ती हसतं हसतं मला बोलतं होती. फार वेळ नव्हता माझ्याकडे चालताना तिला विचारलं तु अकरावीत आहेस का. ती लागलीच हो म्हणाली. ती काही विचारणार ऐवढ्यात मी म्हणालो ठिक आहे अभ्यास करत जा. बहुतेक तिला हे आवडलं नाही ती म्हणाली म्हणजे मी अभ्यास करत नाही असं तुम्हांला वाटतं का. ती नाजुकसा चेहरा रागावल्यासारखा करून माझ्याकडे पाहत होती. मी म्हटलं नाही मी सहजचं बोलतो असं तशी तु छान अभ्यास करताना दिसतेस. हे उत्तर ऐकून ती गालातल्या गालात हसली. आणी बाय म्हणून होस्टेलमध्ये पळून गेली.

                    क्षणभर हा वेळ

                    इथेच थांबला असता

                    अन् भाव मनाचा मी

                    तिला सांगितला असता

                 

ती रिडींगच्या कोपऱ्यात झालेली पहिली भेट आजही आठवली. त्या दिवशी रात्रभर मला झोप आली नाही. सारखा तीचा सुंदर चेहरा माझ्या समोर येत होता. प्रत्येक क्षणात जणु तिचीच आठवण येत होती. रात्रभर जागुनही तिच्यापासून दुर राहु शकलो नाही. ती अचानक माझ्या आयुष्यात का आली असेल. अंधाराला प्रकाशाची साद मिळावी तशी ती मला भेटली होती. तीला मी आवडतो का माझ्यातला कवी. कित्येक प्रश्न तीला विचारण्यासाठी मी आतुर होत होतो. मला तिला आयुष्यभर जपायचं होतं.......

कवी अवी (लातुर महाराष्ट्र) 9623787288

12/08/2020

एक अधुर प्रेम... सोनवी  भाग 1