श्री. गुलाबराव महाराज


श्री गुलाबराव महाराज हे २० व्या शतकातील मराठी संतपरंपरेतील एक थोर संत म्हणून ओळखले जातात. अमरावती जिल्ह्यातील माधान या गावी त्याचा जन्म झाला. (१८८१ - १९१५) त्यांची समाधी आहे. लहानपणापसुनच अंध असलेल्या गुलाबराव महाराजांना त्यांच्या ज्ञानाच्या दिव्यदृष्टीमुळे प्रज्ञाचक्षू असेही म्हटले जाते. त्याच बरोबर, मधुराद्वैताचार्य, समन्वय-महर्षी व श्री. ज्ञानेश्वरकन्या यानावाने ही ते ओळखले जातात.


मराठी, हिंदी व संस्कृत भाषेवर मोठे प्रभुत्व असलेल्या गुलाबराव महाराजांनी, आपल्या केवळ ३४ वर्षांच्या आयुष्यात अनेक विषयांवरील १३३ ग्रंथांची निर्मिती मराठी, हिंदी, व्रज व संस्कृत भाषांत केली. त्यांचा वैदिक, आध्यात्मिक याबरोबरच भारतीय संस्कृती, पाश्चात्य विज्ञान व वैद्यकी, तत्वज्ञान व नितीशास्त्र, यांचा विशेष अभ्यास होता. त्यांच्या साहित्यात संगीत, आयुर्वेद, काव्य, मानसशास्त्र, इ. अनेक विषयांचा समावेश होता.

कर्मकांडात न अडकता, प्रपंच नेटका करीत भक्ती करण्याची शिकवण त्यांनी दिली आहे. श्री.बाबाजी महाराज पंडित हे त्यांचे शिष्य व उत्तराधिकारी होते.
माझी धूळपाटीसंपादन करा

--Girish2k ०८:४८, १९ नोव्हेंबर २०११ (UTC)