सदस्य:Divya keni/धुळपाटी 1
।। श्री शांतादुर्गा पिळर्णकरीण प्रसन्न।।
शांतादुर्गा देवीची मूर्ती पुर्वी मान्या पील्यान तिथे स्थापित होती, मग त्या नंतर ती देवीच्या मुर्तीला बेतीम विठ्ठलाच्या मंदिरात ठेवण्यात आले, मग जेव्हा पोर्तुगीज गोव्यात आले तेव्हा इथल्या हिन्दू समाजातल्या लोकांना त्रास करू लागल्या मुळे इथल्या लोकांनी ती देवीची मूर्ती नारवे बिचोली इथे स्थापित केले. इथले लोक देवीचे दर्शन घेण्यासाठी बोट व बसमध्ये जायचे, पण त्यांना प्रवास करण्यास लांब पडत , त्यामुळे जेव्हा पोर्तुगीज गेल्या नंतर बेतीतल्या लोकांनी मागणी ( प्रसाद) केली व देवीची मूर्ती बेतीत स्थापित केली.
शांतादुर्गा देवीची पालखी वर्षाने एकदाच येते, मार्गशीर्ष महिन्यातल्या एकादशी दिवशी पालखी गावात फिरत असे,अगोदर देवीची पालखी बेतीम गावामध्ये पूर्ण १ दिवस फिरायची व लोक खाद्यावर पालकी न्यायचे पण आता सर्व काही बदल आहे जसे की आता पालकी २दिवस फिरते कारण घर व माणसे वाढलेली आहे आणि आता पालकी गाडीचे रथात फिरवतात. दोन दिवस गावात फिरली नंतर तिसऱ्या दिवशी ' कालो ' साजरा केला जातो, महाप्रसाद असतो व रात्री नाटक ही असते,
श्री शांता दुर्गा ही बेती गावातल्या लोकांची " ग्राम " देवी आहे.