नमस्कार मी देवेंद्रकुमार जगन्नाथ बोरसे सध्या नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. दैनिक गावकरी, दैनिक देशदूत या वृत्तपत्रात मी उपसंपादक, सहसंपादक, वृत्तसंपादक अशा विविध पदांवर मी काम केले आहे. "ऑपरेशन सुरत भुसावळ" ही माझी दैनिक देशदूत मध्ये सन २००१ मध्ये प्रकाशित मालिका. मला दैनिक देशदूत मध्ये प्रकाशित या मालिकेसाठी दैनिक लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे दरवर्षी दिला जाणारा "बाबा दळवी स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार' २००१ हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार घेणार मी लोकमत वृत्तपत्र समूहाबाहेरील आतापर्यंतचा एकमेव पुरस्कारार्थी ठरलो आहे.