अंबाबाई मंदिर - हुपरी
हुपरी ता. हातकणंगले जि .कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिरात भक्तिपूर्ण वातावरणर आहे. श्री अंबाबाई देवी आमचे ग्रामदैवत आहेत. सर्व गावावर देवीची कृपादृष्टी कायमच असते. आज गावात जी समृद्धी ,भरभराट,शांतात आहे, ते देवीच्या आशीर्वादानेच. सर्व गावकरी आणि भाविक देवीची मनोभावे आराधना करतात. त्यातच दसरा हा एवढा मोठा सण म्हणजे पर्वणीच आहे .सर्व वातावरण भक्तिमय आणि चैतन्यमय होऊन जाते. श्री अंबाबाई देवीचे मंदिर गावाच्या मध्यभागी स्थिर आहे.प्रशस्थ ,ऐसपैस अश्या ऐतिहासिक भुईकोट किल्यात हे मंदिर आहे. चार बाजूला भव्य बुरुज आणि त्यांना जोडणारी भक्कम तटबंदी आणि अशी रचना मंदिराला सुरक्षा देते,आणि सौदर्यात भर घालते. किल्यात प्रवेश करणे साठी पूर्व, दक्षिण आणि उत्तर बाजूस भव्य प्रवेश द्वार आहेत, पूर्व आणि दक्षिण बाजूने वाहनाने थेट मंदिर पर्यन्त पोहोचता येते. तर उत्तरेला दगडी पायऱ्यांची सोय आहे . देवीचे मंदिर भव्य असून दुमजली आहे. कौलारू छप्परांची रचना आणि जुने पण भक्कम लाकूड काम वेधून घेते . गाभारा, गर्भगृह अशी जुनी इमारत आणि समोर नावीण साकारलेला सभामंडप अशी एकंदरीत रचना आहे.