कुन्हा त्रिस्ताव दे ब्रागान्झा यांचा जन्म २ एप्रिल १८९१ रोजी चंडोर-सालसे येथे झाला. गोव्याच्या राष्ट्रीयतत्वाचे जनक म्हणून प्रसिद्ध होते. ते साम्राज्यवाद-वसाहदवाद यांचे विरोधक होते. १९२८ मध्ये गोवा कॉंग्रेस कमिटीशी सलग्न केली. १९२९ साली गोव्याच्या कुणबी कुटुंबाची चहा मळेवाल्यांकडून फसवणूक झाली होती. आई. एन. सी च्या मदतीने अशा कुटुंबांची सुटका १९४० साली घडवून आली. १९४१ साली सालसे, मार्मागोवा शेतकऱ्यांसाठी फंड उभारला गेला. १९३९-४६ कालावधीत गोव्याचे झालेले राष्ट्रीयीकरण या विषयावर अनेक पत्रके-लेख प्रसिद्ध केले. ३० जून १९४६ रोजी मडगाव येथे त्यांना अटक, मारहाण करण्यात आले व चंडोर येथे सोडण्यात आले. १२ जुलै १९४६ रोजी मडगाव पोलिसांनी त्यांना पकडून अगुदा जेलमध्ये डांबले. २८ जुलै १९४६ रोजी ८ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. प्रथमत: लिस्बनच्या पेनिक किल्यात धाडले. १९५२ साली जेलमधून सोडले मात्र गोवा येथे जाण्यास मज्जाव केला. १९५३ साली पॅरीसचा प्रवासी पासपोर्ट घेऊन मुंबईत सटकले. मुंबईतून गोवा, दादरा नगरहवेली मुक्तीसाठी प्रयत्न केले. 'आझाद गोवा' कोकणी, फ्री गोवा या नियतकालिकातून लेखन केले. १९३६ मध्ये त्यांच्या दोन पुस्तिका प्रसिद्ध झाल्या. १] The Basic Problem आणि २] The Rice Problem या दोन्ही पुस्तिकांबद्दल पोर्तुगीज सरकारने त्यांच्यावर खटले भरले, पण कोर्टात ते निर्दोषी ठरले. १९४० च्या ऑगस्ट महिन्यात सासष्टी व मुरगावच्या समुद्रकिनाऱ्यांवर पावसाने व वादळी वाऱ्याने हाहा:कार उडविला. गरिबांची शेकडो घरे जमीनदोस्त झाली. त्यांच्यासाठी मदतीची मोहीम कुन्हांची उघडली. या घटनांचा साद्यंत इतिहास १९४१ मध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेल्या A Relief Campaign पुस्तकेत आढळतो. गोमंतकीय समाजाकडे एकसंधपणे पाहण्याची त्यांची दृष्टी त्यातून सुस्पष्ट होते. १९४४ मध्ये Denationalisation Of Goans हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. २६ सप्टेंबर १९५८ रोजी त्यांचे निधन झाले.

संदर्भ ग्रंथ १. शहासने चंद्रकांत, देशभक्त कोश, बहुजन साहित्यधारा, ९ ऑगस्ट २०१२, पृष्ठ क्र. ७६४ . २. सरदेसाई मनोहर हिरबा, कला आणि संस्कृती संचालनालय, १९८६, पृष्ठ क्र. २१०.