भारतातील बेरोजगारी
  1. प्रस्ताविक

1.भारताच्या विकासामध्ये बेरोजगारीची समस्या हे मोठे आव्हान आहे.भारत हा तरूणांचा देश आहे.तरूणांतील बेरोजगारी हे 21 व्या शतकातील भारतासमोरील मोठे आव्हान आहे.

  1. बेरोजगारीचा अर्थ

बेरोजगारीचा अर्थ असा की,ज्या परिस्थितीत 15 ते 59 या वयोगटातील व्यक्तींना प्रचलित वेतनदरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असून ही रोजगार मिळत नाही. 2.राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेच्या (N.S.S.O)सांख्यिकीय माहितीनुसार भारतात एखादी व्यक्ती दर आठवड्याला 14 तासांपेक्षा कमी काम करते,अशा व्यक्तीस बेरोजगार व्यक्ती म्हणतात.जी व्यक्ती दर आठवडय़ाला 15 ते 28 तास काम करते,अशा व्यक्तीला न्यून रोजगार असणारी व्यक्ती असे म्हणतात.जी व्यक्ती दररोज आठ तास म्हणजेच प्रत्येक वर्षाला 273 दिवस काम करते अशा व्यक्तीला रोजगार असलेली व्यक्ती असे म्हणतात.