कागल राम मंदिर

आग्रा येथील ताजमहलासाठी वापरलेल्या राजस्ताथानातील मकराना येथील शुभ्र संगम रवरातून कागल मधील श्रीराम मंदिरात जीर्णोद्धार केला आहे . स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या सह ,छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आणि लोकसहभागातून स्थापत्य शाश्त्रतील आगळे मंदिर साकारले आहे . गेल्या नऊ वर्ष पासून सुरु असलेले काम पूर्णत्वास येत असून ,९ते ११ मार्च या दरम्यान विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांनी मंदिराचा लोकार्पण होईल . कागल खर्डेकर चौकातील श्रीराम मंदिराची जुनी इमारत जीर्ण झाल्याने दहा वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धाराची संकल्पना स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी मांडली .आमदार हसन मुश्रीफ यांच्या सह कागल च्या नागरिकांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा विचार केला . मंदिरासाठी सहा कोटी रुपयांचा खर्च आला .असून यातील २ कोटी ३२ लाख रुपये आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने सरकारकडून मिळाले .. ३ कोटी २० लाख रुपयांचा निधी छत्रपती शाहू कारखान्याचे सभासद ,कर्मचारी ,कंत्राटदार आणि इतर देणगीदारांनी दिला .कागल च्या नागरिकांनी हि मंदिरासाठी मोठा हातभार लावला . १२ गुंठे जागेतील मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी वापरलेले संगमरवर राजस्थान मधील मकराना येथून मागवले आहे .तळमजल्यावर चार हजार स्क्वेवर फुटाचे ध्यान मंदिर व प्रवचन हॉल आहे .मुख्य मंदिरासाठी २२ मोठे नक्षी दार खांब वापरले असून ,मुख्य गाभार्या सह मंदिरात दहा मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे .श्रीराम,सीता ,लक्ष्मण ,मारुती ,गणपती ,दत्त ,महालक्ष्मी ,शंकर ,पार्वती ,आणि नंदी सह या दहा देवतांच्या मूर्ती राजस्थानातील जयपूर हून मागवल्या आहेत .मंदिराचा सहा फुटी पितळी कळस आणि ध्वजदंडा बडोद्याहून मागवला आहे . ९ ते ११ मार्च दरम्यान लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे .यासाठी श्री साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे ,उद्योजक प्रवीणसिंह घाटगे नियोजन करीत आहेत .कागल मधील प्राचीन राम मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे स्वप्न स्वर्गीय राजे साहेबानी खूप वर्षांपूर्वी पाहिले होते .मोठ्या जिद्दीने त्यांनी मंदिर उभारण्याचे काम हाती घेतले . सर्वच लहान थोर व्यक्तीने  योगदान दिल्याने त्यांची हि स्वप्न पूर्ती आज सत्यात उतरली आहे ....