श्री हलसिद्धनाथ

सर्वात प्रथम पूर्वीच्याकाळी श्री हलसिद्धनाथ देव हे निपाणी येथील त्यांच्या वाड्यात गाय राखण्याचे काम करत असत.  त्यावेळी हालसिद्धनाथ हे आपले काम प्रामाणिकपणे करत असतात.  त्यावेळी त्यांना तेथे दोन वेळा आहार पण व्यवस्थित मिळत नसे म्हणून ते गाईचे दूध पीत.  सरकारांना समजले तेव्हा त्यांनी श्री हालसिद्धनाथ यांना रुईचा चीक पिण्यास दिला काय झाले नाही तेव्हा त्यांनी निपाणीकर सरकारांना शाप देऊन आले की तुमच्या घराचा वंशी वाढणार नाही व ते निपाणी सोडून वेदगंगा नदी पार करून यायचे होते पण त्यांना कोणीही मदत केली नाही तेव्हा त्यांनी नदीच्या पाण्यावर आपले घुमरे टाकले व त्यावर बसून आले.  सध्या राहिले व नंतर आप्पाचीवाडी येथे कारी या ठिकाणी माळ भागावर वस्ती करून राहू लागले व शेवटी त्यांनी वाडीतील घुमट या ठिकाणी समाधी घेतली व तेव्हापासून श्री शेत्र आप्पाचीवाडी हे स्थळ एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले व तेव्हापासून भूमिपूजनाच्या दिवशी तेथील यात्रेचा प्रारंभ होते व पाच दिवस हा उत्सव चालू राहतो.  या उत्सवामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे भूमिपूजन दिवशी प्रथम पालखी बसणे म्हणजे देव बसणे हा कार्यक्रम होतो  श्री मंदिराची व गावाची स्वच्छता करून घेतली जाते.  त्यापूर्वी गावातील लोकांची ग्रामसभा घेऊन कोणाला कोणता मान देणे चर्चा करून त्यानुसार कामाची जबाबदारी दिली जाते.  दुसऱ्या दिवशी यात्रेचा कार्यक्रम म्हणजे गजी खेळणे हा मनोरंजनाचा खेळ कार्यक्रम खेळण्यात येतो.  तिसऱ्या दिवशी दिवसभर यात्रेचा उत्सव चालू असतो व रात्री वालंग बांधून वादनाचे कार्यक्रम चालू असतो त्याबरोबर भंडाऱ्याची उधळण हे चालू असते व चौथ्या दिवशी पहाटे चार वाजता भाकणूक महादेव अंगात येऊन भविष्य सांगण्याचा कार्यक्रम चालू असतो.  देवाची घोडी सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते.  तसेच रात्रीच्या वेळी पालखी व सबिना बाहेर काढून त्यांची मिरवणूक व पूजा केली जाते.  सर्वात मोठी पूजा म्हणजे दिवसा नैवेद्य दुपारी भर बारा वाजता दाखवून तो गरीब लोकांना महाप्रसाद म्हणून काढला जातो.  त्यावेळी मोठी भाकनुक सांगितली जाते त्यामध्ये आतापर्यंत अनेक गोष्टी सत्य घडल्या आहेत.  उदाहरणार्थ कळपात मरेल म्हणजे इंदिरा गांधींना त्यांच्या जवळच माणसाने मारले होते.  तसेच काँग्रेस पक्षात फूट पडेल म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असेल दिल्लीमध्ये भगवा फडकेल म्हणजे केंद्रात भाजपची सत्ता येणे.  बरोबर मळ्याचा माळ व माळाचा मळा होईल म्हणजे नदीचा भाग पडत आहे महापुरामुळे माळ भागाची जमीन मनाप्रमाणे चांगली पिकत आहे.  अशी अनेक उदाहरणे देता येतील.  बोल वादनाचा आवाज आणि मल्ल्या डोंगरावर ऐकू येत नाही. या पाच दिवसात गावात फार प्रवित्र वातावरण असते.  या पाच दिवसाच्या गावातील सिद्धनाथाच्या दर्शनास अनेक हजारो भाविक येतात.  कोणाला भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजित केला जातो.शेतातील ऊस पूजनासाठी येथे आणले जातात यात्रेच्या शेवटच्या दिवशी पालखी होणे हा कार्यक्रम म्हणजे पालखी सबिना म्हणजे सर्व देवपूजेची घोड्यांची भव्य मिरवणूक भंडारा, खोबरे ,खारका यांच्या उधळणीत पार पाडले जाते.  वाडीतील पालखी वाडीमध्ये व कुरलीतील पालखी कुरली कडे रवाना होते अशा प्रकारे या मोठ्या उत्साहाने श्री हालसिद्धनाथ यात्रा उत्सव पार पडला जातो.

http://www.shrihalsidhanath.com/appachiwadi-kurli.html