मी गणित विषयाचा प्राध्यापक असून १९७७ पासून 1988 पर्यंत स.प.महाविद्यालय, पुणे येथे व १९८८ ते २०१७ पर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे कार्यरत होतो. १९८०-८४ या कालावधीत शिक्षक शिष्यवृत्ती अंतर्गत मी पंजाब विद्यापीठ चंडीगड येथे गणित विषयात एम.फिल. व पीएच.डी. या पदव्या संपादन केल्या. प्रा. अनंत राजवाडे हे माझे संशोधनाचे मार्गदर्शक होते. माझ्या गणित प्रवासात माझ्यावर प्रा. म. रा. राईलकर, प्रा. मा. रा. मोडक, प्रा. श्रीराम अभ्यंकर यांचा विशेष प्रभाव आहे. गणित ऑलिम्पियाड, राष्ट्रीय उच्चतर गणित मंडळ व राष्ट्रीय गणित केंद्र यांच्या गणित विषयक कार्यशाळा, बालभारती गणित पुस्तके (पहिली ते पाचवी) या संदर्भातील विविध कामकाजांमध्ये माझा समावेश होता.