गोविंद पुंडलिक हेगडे देसाई

गोविंद पुंडलिक हेगडे देसाई म्हणजेच ‘भारतकार हेगडे देसाई' यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८५ रोजी रिवण गोवा येथे झाला. हेगडे देसाईना विठ्ठल प्रभू देसाई यांच्याकडून पुंडलिक गोविंद हेगडे यांनी दत्तक घेतले. त्यांनी ६ नोव्हेंबर १९१२ रोजी ‘भारत' नावाचे नियतकालिक सुरू केले. सुरुवातीला हे नियतकालिक पोर्तुगीज व मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध होत होते. पण नंतर त्यांनी केवळ मराठीतूनच ‘भारत' हे नियतकालिक सुरू ठेवले. या नियतकालिकावरूनच गोमंतकीयांनी त्यांना ‘भारातकार’ ही उपाधी प्राप्त केली. त्यांना एक देशभक्त,निष्ठावंत पत्रकार, निःस्वार्थ समाजसेवक म्हणून संपूर्ण गोमंतक त्यांना ओळखतो. भारतकरांनी पोर्तुगीजांविरुद्ध चळवळ सुरू केली म्हणून त्यांच्यावर पन्नासहून अधिक खटले भरण्यात आले. त्यामुळे त्यांना तुरुंगवास, तसेच त्यांना आर्थिक दंड देखील भरण्यास लावले. इतक्या यातना सहन करूनही भारतकरांनी हार मानली नाही. ते आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत समाजकार्य करत राहिले. शेवटी टायफॉडच्या आजाराने १५ ऑगस्ट १९४९ रोजी त्यांचे निधन झाले. असा हा गोमंतक - गडकरी माधव, अशोक केशव कोठावळे, जानेवारी २००५ ३री आवृत्ती