सदस्य:रवींद्र चिंचोलकर/२०ऑगस्ट कार्यशाळा
शंकर शिवदारे
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सोलापूर जिल्हयातील व्यक्तींनीही मोठे योगदान दिले आहे. येथील चार हुतात्म्यांनी स्वातंत्र्यलढ्यात जे बलिदान दिले, त्यामुळे सोलापूर शहराला हुतात्मानगरी म्हणूनही ओळखले जाते. मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि अब्दुल रसूल कुर्बान हुसेन ही त्या चार हुतात्मांची नावे आहेत. पण त्या आधीही सोलापुरात एक तरुण हुतात्मा झाला, त्याचे नाव शंकर शिवदारे.
सोलापूर जिल्हयात स्वातंत्र्यलढयाचे पडसाद लोकमान्य टिळकांच्या कालखंडापासूनच उमटत होते.
* 1920 नंतर महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढयाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर महिला, कामगार, शेतकरी, तरुण वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिक मोठया प्रमाणात स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होऊ लागले.
5 मे 1930 रोजी महात्मा गांधींना इंग्रज सरकारने अटक केल्याचे वृत्त सोलापुरात समजले, तेव्हा लोक अवस्थ झाले. 6 मे रोजी सोलापूर शहरात युवकांनी , महिलांनी मिरवणुका काढून गांधीजींच्या अटकेचा निषेध नोंदविला. काही जणांनी तर प्रक्षुब्ध होऊन नासधूस करण्यास सुरुवात केली. दुकाने, बाजारपेठा बंद करण्यात आल्या. याच दिवशी “रात्री 8.30 वाजता टिळक चौकात कॉंग्रेसच्या वतीने श्री. जाजूंनी सभा घेतली.श्री. जाजू, राजवाडे, शेठ गुलाबचंद, शेठ माणिकचंद शहा, कुर्बान हुसेन, महाजन वकील, च.रा. वांगी, सिद्रामप्पा फुलारी, आशण्णा इराबत्ती, कु.हिराबाई रांगोळी, डॉ. अंत्रोळीकर, कुंजविहारी, पंचप्प जिरगे, अंबण्णप्प शेडजाळे, डॉ. व्होरा, भांबुरे, जगन्नाथ शिंदे हे वक्ते होते” [१].
सोलापूर शहरात काही विपरित घडू नये म्हणून कॉंग्रेसने शांततेचे आवाहन केले व सर्व कार्यक्रम तूर्त रद्द करावे असे ठरविले. मात्र तरुण कार्यकर्ते शांत रहायला तयार नव्हते. त्यांनी वेगळी सभा घेऊन सोलापूरमध्ये तीन दिवसांचा हरताळ पाळण्याचा निर्णय घेतला. सोलापूरमधील वातावरण तापत गेले. 7 मे 1930 रोजी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. स्वातंत्र्यलढ्यातील नेते वीर नरीमन आणि जमनालाल बजाज यांना द्मंग्रज सरकारने अटक केल्याचे 8 मे रोजी कळाले . त्यानंतर तर सोलापुरातील कार्यकर्त्यांचा संयम संपला. युवक संघाने सकाळीच जंगी मिरवणूक काढली व टिळक चौकात मिरवणुकीचे रुपांतर सभेत झाले.
काही तरुण सत्याग्रहाचा भाग म्हणून रुपाभवानी परिसरात शिंदीचे झाडे तोडू लागले. हे समजताच “इन्स्पेक्टर नॅपेट दोन लॉ-या पोलिस घेऊन तिथे हजर झाला. नॅपेटने नऊ जणांना पकडले. हे समजताच जमाव प्रक्षुब्ध झाला. अटक केलेल्यांना सोडा असा सर्वांचाआग्रह होता. कलेक्टर नाईट आणि डीएसपी प्लेफेअर पोलिस घेऊन तेथे आले. कलेक्टर गाडीतून उतरलेते पिस्तुल रोखूनच , त्यामुळे जमाव अधिकच भडकला “[2].
पकडलेल्यांना सोडावे याबाबत चर्चा सुरु असतानाच एक 20 वर्षाचा धाडसी तरुण हातात झेंडा घेऊन कलेक्टरकडे धावत आला व पकडलेल्यांना सोडाच असे म्हणू लागला. तेव्हा एका सॉर्जंटने गोळी झाडली, त्यात त्या तरुणाचा मूत्यू झाला. तो तरुण म्हणजेच सोलापुरचा पहिला हुतात्मा शंकर शिवदारे होय.
कुर्बान हुसेन
संपादनकुर्बान हुसेन हे सोलापूर येथे पत्रकार होते. त्यांनी १९२७ साली ‘गझनफर’ नावाचे उर्दू भाषेतील साप्ताहिक सुरु केले होते. ‘गझनफर’ या शब्दाचा अर्थ आहे सिंह .लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’ वृत्तपत्राने ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यासाठी जागृती केली, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हयात कुर्बान हुसेन यांच्या ‘गझनफर’ वृत्तपत्राने कार्य सुरु केले होते. “गझनफर हे नाव उर्दू भाषेतील होतं, परंतु ते मराठी भाषेत देवनागरी लिपीत छापले जात असे”[१] त्यांनी गझनफर वृत्तपत्रातून स्वातंत्र्यलढा, कामगारांचे प्रश्न, हिदु-मुस्लिम ऐक्य यासह विविध विषयांवर लेखन केले. त्यांची भाषा प्रभावी आणि परखड होती.कुर्बान हुसेन हे एका सामान्य मुस्लीम कुतुंबात जन्माला आले. ते गिरणी कामगार होते. कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जात होते, ते सभांमध्ये अतिशय प्रभावी भाषणे करीत असत. ५ मे १९३० रोजी महात्मा गांधीजींना अटक झाल्यानंतर सोलापूर शहरात जे सभा झाली, त्यातील त्यांचे भाषण ऐकून तरुण कार्यकर्ते इंग्रजाविरुद्ध पेटून उठले होते. सोलापुरातील तरुण रस्त्यावर उतरल्यानंतर येथील परिस्थिती कलेक्टर यांच्या नियंत्रणाबाहेर गेली तेव्हा क़ि रजेवर गेले. त्यामुळे ९, १०. ११ मे १९३० हे तीन दिवस सोलापूर शहरात इंग्रज सरकारचे शासनच नव्हते.
भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी तीन दिवस सोलापूर शहराने पूर्ण स्वातंत्र्य अनुभवले. कुर्बान हुसेन यांना इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून, 12 जानेवारी १९३१ रोजी फासावर चढविले. त्यावेळी कुर्बान हुसेन यांचे वय अवघे 22 वर्षे होते. एवढ्या तरुण वयात हौतात्म्य लाभलेले ते पहिलेच संपादक असावेत. सोलापुरातील स्वातंत्र्यलढा दडपण्यासाठी इंग्रजांनी मार्शल लॉ लागू केला. त्यामुळे कुर्बान हुसेन यांचे वृत्तपत्र बंद पडले.