सदस्य:प्रसाद नंदकुमार कानडे/20ऑगस्ट कार्यशाळा

सोलापूरचे सार्वजनिक काका बाबुराव जक्कल पुण्य्च्या डेक्कन कॉलेजमध्ये इंटर मध्ये शिकत असताना महत्मा गांधीजी यांच्या आदेशानुसार १९२० च्या असहकार चळवळीला प्रतिसाद देण्यसाठी शिक्षण अर्धवट सोडणारे , सोलापुरात आल्यावर वृत्तपत्र व मुद्रण व्यवसायात आयुष्याच्या अखेरपर्यंत व्यस्त राहिलेले ,सोलापुरातील अनेक लोकोपयोगी संस्थेत क्रियाशील भाग घेवून सोलापूरचे एक भूषण होते . त्यांचा जन्म 10 साप्तेम्बेर १९०० साली झाला .वयाच्या ८ व्या वर्षी आईचे तर १४ व्या वर्षी वडिलांचे निधन झाले . त्यामुळे त्यांचे संगोपन मोठे बंधू विठ्ठलराव जक्कल यांनी केले . प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिष्यवृत्ती मिळवून बाबुराव यांनी आपणं हुशार विद्यार्थी असल्यचे सिद्ध केले होते. सोलापुरात त्या काळी उच्च शिक्षणची सोय न्हवती यामुळे त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला खरा पण महात्मा गांधी यांच्या अदेश्नुसार असहकार चळवळीचा भाग म्हणून त्यांनी कॉलेज वर बहिष्कार घातला.त्यातच ते पुढे आजारी पडल्याने इच्छा असूनही पुढे पदवी पर्यंत शिकू शकले नाही . १९२४ साली सोलापुरात परत आल्यानंतर ते चालवीत असलेल्या सोलापूर समाचार या साप्ताहिकाच्या कामात लक्ष घालायला सुरुवात केली .सोलापूर शहराला साप्तीहिका एवजी दैनिकाची गरजा असल्याचे लक्षात आल्यांनतर त्यांनी सोलापूर समाचार चे देनिकात रुपांतर केले .१९३६ साली सोलापूर शहराची व जिल्हाची सर्वांगींन माहिती समाचार च्या जुबली अंकात छापली . संपादकाने केवळ कार्यालयात बसून अग्रलेख लिहिण्याबरोबरच जनमानस समजून घेण्यसाठी अनेक प्रकारच्या सामाजिक , सांस्कृतिक संस्थेत हि भाग घेतला पाहिजे अशी त्यांची धारणा होती .सोलापूर नगरपालिका कामगार संघटना , साहित्य परिषद अशा विविध संस्थेत ते भाग घेत . लहानपणा पासूनच त्यांना समाज सेवेची आवड होती पूर्व भागातील तेलुगु भाषिक वस्ती मध्ये त्यांनी बालसमाज नांवाची तरुणांची संघटना काढली होती.