भीवगो गुणो
कोदाळ: गोव्यातील सत्तरी या तालुक्यातील कोदाळ गावात “भीवगो गुणो” या नावाचा दगड आहे. हा दगड लोकांच्या वसाहतीपासून थोडासा दूर आत जंगलात आहे.
या दगडाविषयी काही आख्यायिका व कथा सांगितल्या जातात. ह्या दगडाच्या उंचीत दरवर्षी वाढ होते असते. निमगो आणि भीवगो नावाचे मामा आणि भाचा असे दोन व्यक्ती होते. शेत जमिनीमुळे त्यांच्यात भांडणे झाली त्यामुळे हे दगड म्हणजेच मामा आणि भाचा एकमेकांना पाठ करून उभे आहे असे म्हटले जाते. आणि नंतर ह्या व्यक्ती ज्या जागेवर मरण पावल्या त्या जागेला किंवा त्या दगडाला ‘भीवगो गुणो’ आणि ‘निमगो गुणो’ या नावाने ओळखले जाते. अशी कथात्म्क माहिती कोदाळ गावातील रहीवासी देऊ गावकर यांनी दिलेली आहे.