सदस्य:तेजस्विनी कांबळे/२०ऑगस्ट कार्यशाळा
मल्लप्पा रेवणसिद्धप्पा धनशेट्टी हे राष्ट्रीय सभेचे कार्यकर्ते होते. तसेच महात्मा गांधींच्या अहिंसा तत्वाचे एकनिष्ठ अनुयायी होते. उंचा पुरा बांधा,पैलवान पिळदार शरीर आणि रुबाबदार चेहरा यामुळे त्याचे व्यक्तिमत्व उठून दिसत. सोलापूरमध्ये झालेल्या स्वातंत्र्य लढ्यातील चार हुतात्मापैकी मल्लप्पा धनशेट्टी हे एक आहेत.
मल्लप्पा रेवणसिद्धप्पा धनशेट्टी यांचा जन्म १८९८ झाला. सोलापुरातील पंदारकर पिढीचे ते मुख्य मुनीम होते. निःस्वार्थ वृत्तीने ते सार्वजनिक कामात सहभागी होत. प्रसिद्धीपासून दूर राहून काम करण्याची त्यांची पद्धती होती. लोकप्रियता,जनमान्यता आणि पुढारीपण हे विश्वसनीय कार्यपद्धतीमुळे त्यांच्याकडे आले. काँग्रेसने चालवलेल्या राष्ट्रीय चळवळीत सोलापूरच्या सामान्य जनतेला आणण्याचे श्रेय त्यांनाच आहे. धनशेट्टीनी सत्याग्रह व दारूबंदीच्या चळवळी धडाडीने गाजवल्या. धनशेट्टीच्या रूपाने राष्ट्रतेजाची नवज्योत उत्पन्न झाली. हजारो लोक मिरवणुकीत सामील होऊ लागले आणि हरताळ यशस्वी होऊ लागल्या. जनतेवर त्यांचा चांगला वचक होता त्यामुळे अनेक मोर्चे,मिरवणूक सभा शांततेने पार पडल्या जात. ८ मे १९३० रोजी श्री जमनालाल बजाज आणि श्री नरीमन यांच्या अटकेची बातमी आली. 'युवक संघाने' महामिरवणूक काढली. मिरवणुकीत श्री धनशेट्टी यांचा देखील सहभाग होता. मिरवणुकीची व्यवस्था पाहून थकलेल्या श्री धनशेट्टींची थोडी विश्रांती झाली न झाली तुळजापूर वेशीकडे गडबडीचा बातमी आली. तेथे त्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत कलेक्टर नाईट आणि डीएसपी प्लेफेअर यांना वाचविले. ७-८ हजारांचा जमाव फक्त एक लाठी हाती घेऊन पांगवला. कलेक्टर नाईट आणि डीएसपी प्लेफेअर यांना हा प्रसंग मानहानीकारक वाटला. त्यांनी मार्शल लॉ लादून अक्षरशः सैतानाला लाजवेल असा धुमाकूळ घातला. ८ मे १९३० रोजीच्या गोळीबारामुळे बेभान झालेल्या जमावाने केलेल्या कृत्याबद्दल सर्वस्वी धनशेट्टी,शिंदे,सारडा आणि कुर्बान हुसेन याना जबाबदार धरून त्यांचे अमानुष्य हाल केले. पण त्यांनी त्याबद्दल तक्रार केली नाही. त्यांचे मनोधैर्य देखील खचले नाही. अटक केल्या पासून ते फाशी देई पर्यंत शिंदे,सारडा आणि कुर्बान हुसेन तिघांनाही श्री धनशेट्टीच वडिलकीचा आधार होते. १२ जानेवारी १९३१ रोजी धनशेट्टी,शिंदे,सारडा आणि कुर्बान हुसेन यांना फाशी देण्यात आली आणि मल्लप्पा धनशेट्टी हे स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झाले.
संदर्भ
संपादन- मार्शल लॉ आणि सोलापूरचे चार हुतात्मे-प्रा.डॉ.नीलकंठ पुंडे