सदस्य:तुषार सरोदे/s12
राम नदी ही पुणे शहरात असलेली एक नदी आहे. ती पुण्याच्या वायव्येला असलेल्या खाटपेवाडी येथील डॊंगरात उगम पावते आणि पुण्यातील बावधन, पाषाण, बाणेर, औंध भागांतून वाहत जात मुळा नदीला मिळते. बेकायदेशीर घरबांधणीमुळे राम नदीचे पात्र आकसले आहे. [१] तिच्यात कॆरकचरा टाकल्याने तिला नाल्याचे स्वरूप आले आहे.
पुणेकरांची मागणी आहे की राम नदीचे पुनरुज्जीवन व्हावे. रामनदीची स्वच्छता आणि संवर्धनाच्या कामात रामनदी स्वच्छता अभियान समिती गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. यामध्ये रामनदी स्वच्छता अभियान, जनजागृतीपर रामनदी जलदिंडी आणि रामनदी परिक्रमा कार्यक्रम रामनदीच्या खोऱ्यात भूकुम, भूगाव, बावधन बु, बावधन खु, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर आणि औंध या गावांमध्ये राबवले जातात.
रामनदी वर खाटपेवाडी तलाव, मानस तलाव आणि पाषाण तलाव असे ३ तलाव आहेत.
अतिक्रमण
संपादन
संदर्भ
संपादन- ^ पुणे मिरर. https://punemirror.indiatimes.com https://punemirror.indiatimes.com/pune/civic/ngt-orders-panel-to-submit-ramnadi-river-encroachment-report/articleshow/47400386.cms. Missing or empty
|title=
(सहाय्य); External link in|संकेतस्थळ=
(सहाय्य)