अनंत सखाराम अभिषेकी यांचा जन्म ३ जुलै १९३५ साली सावाइवेरे फोंडा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सखाराम हरी अभिषेकी असे होते. १९४७ ते १९५४ या काळात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रभातफेर्‍यामध्ये सहभाग होता. घर झडतीत त्यांच्या वडिलांना अटक करण्यात आली आणि त्यांना २५०० रु. दंड देऊन १८ दिवसांनी मुक्त केले. त्यांना टेरिटोरियल मिलिटरी ट्रिब्यूनलने १ वर्ष सक्त मजुरी + १५ एस्कूडो दररोजचा दंड अशी शिक्षा ठोठावली.

पुस्तक- देशभक्तकोश लेखक - चंद्रकांत शहासने प्रकाशक- बहुजन साहित्यधारा,पुणे दिनांक- ९ ऑगस्ट २०१२ पानक्रमांक- ७५५/७५६