लीला चिटणीस(९ सप्टेंबर १९१२- १४ जुलै २००३)ह्या १९३० ते १९८० ह्या कालखंडातील मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील चरित्र अभिनेत्या होत्या. त्यांनी अभिनयक्षेत्रात येण्याआधी शिक्षिकेचे काम केले. त्यांचे त्यांच्या पतींबरोबरचे समाजकार्यातील योगदानही मोठे आहे. लीला ह्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधून काम केले तसेच त्यांनी 'आज कि बात' ह्या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. त्यांची 'माँ ' ह्या चित्रपटातील भूमिका अविस्मरणीय ठरली.‘लक्स’ साबणाच्या जाहिरातीसाठी मॉडेलिंग करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या.[१]



जन्म आणि कौटुंबिक माहिती संपादन

प्रसिद्ध चरित्र अभिनेत्री लीला चिटणीस ह्यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड येथे ९ सप्टेंबर १९१२ रोजी झाला.

लीला ह्यांचे पूर्वाश्रमीचे नाव लीला नगरकर होते.

त्यांचे वडील शिक्षक होते, नंतरच्या काळात म्हणजेच १९१९-२०मध्ये मुंबईच्या एलफिस्टन कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक होते.

त्यांना तीन बहिणी आणि तीन भाऊ होते. त्यांचा डॉ.गजानन यशवंत चिटणीस ह्यांच्याशी प्रथम विवाह झाला. तर ‘गुली’ नामक चित्रपट वितरकाबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला.


शिक्षण संपादन

लीला ह्यांचे शालेय शिक्षण इमॅन्युएल गर्ल्स स्कूलमध्ये झाले. त्यांचे बी.ए पर्यंतचे शिक्षण झाले . त्यानंतर मारवाडी गर्ल्स हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षिकेची नोकरी केली.


कारकीर्द संपादन

१९३५ साली 'आदर्श चित्र संस्थेच्या 'धुवाँधार'या बोलपटाच्याद्वारे त्यांचा चित्रपटक्षेत्रात प्रवेश झाला.त्यानंतर 'हंसचित्र'च्या 'छाया'ह्या चित्रपटात त्यांनी भूमिका केली.ह्या चित्रपटाची कथा विी.स.खांडेकर ह्यांची होती तर ह्या चित्रपटात त्यांचे सहकलाकार रत्नप्रभा,मा.विनायक,बाबूराव पेंढारकर,दादा साळवी आणि इंदिरा वाडकर हे होते.ह्या चित्रपटानंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या.त्यानंतर त्यांनी प्रभात फिल्म कंपनीच्या 'वहाँ'ाह्या चित्रपटात भूमिका केली. ह्यानंतर लीला ह्यांनी दर्याना प्रोडक्शनशी वर्षभर ८०० रुपये वेतनावर वर्षभराचा करार केला व या संस्थेच्या 'जंटलमन डाकू','इन्साफ' ह्या चित्रपटात नायिकेच्या भूमिका केल्या.. नंतर मिनर्व्हा मुव्हिटोनच्या सोहराब मोदी यांनी त्यांना ‘जेलर’ या चित्रपटात भूमिका दिली. या चित्रपटातल्या भूमिकेनंतरच चित्रपट व्यवसायात लीला चिटणीस यांची दखल घेतली गेली. पुढे रणजित फिल्म कंपनीच्या ‘संत तुलसीदास’ चित्रपटात नायिकेच्या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांचा बॉम्बे टॉकीजशी तीन वर्षांचा करार झाला आणि ‘कंगन’, ‘बंधन’, ‘झूला’ या चित्रपटांत त्यांनी काम केले, नायक होते अशोककुमार. ‘कंगन’ चित्रपटाला यश मिळाल्यामुळे त्यांना ‘आजाद’ हा चित्रपट मिळाला. तसेच ‘हंस’ चित्रच्या ‘अर्धांगी’, ‘दिल की रानी’ या मा. विनायक दिग्दर्शित चित्रपटांत त्यांनी भूमिका केली. मधल्या काळात त्यांनी ‘कंचन’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्या चित्रपटाचे कथानकही त्यांनी लिहिले होते. त्यांनी चित्रा प्रॉडक्शन ही स्वत:ची संस्था सुरू केली होती. ‘कंचन’नंतर या संस्थेद्वारे त्यांनी ‘किसीसे ना कहना’ या चित्रपटाची निर्मिती केली. ‘शहीद’ या फिल्मीस्तानच्या चित्रपटात त्यांनी सर्वप्रथम दिलीपकुमारच्या आईची भूमिका केली आणि त्यानंतर अनेक चित्रपटात त्यांनी चरित्रभूमिका केल्या. १९५१ साली बिमल रॉय दिग्दर्शित ‘माँ’ या चित्रपटातली त्यांची भूमिका अविस्मरणीय ठरली. दरम्यान १९४१ साली ‘लक्स’ साबणाच्या जाहिरातीसाठी मॉडेलिंग करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या. लीला चिटणीस यांनी दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद, धर्मेंद्र, सुनील दत्त, संजीवकुमार, [[राजेश खन्ना|राजेश खन्ना , राजेंद्रकुमार या त्या काळी गाजलेल्या अभिनेत्यांबरोबर काम केले.[२]

उत्तरार्ध संपादन

१९८० साली प्रदर्शित झालेला ‘रामू तो है दिवाना’ हा लीला चिटणीस यांचा शेवटचा चित्रपट होय. पुढे त्यांनी अमेरिकेत काही काळ स्थलांतर केले, तिथे चरितार्थासाठी त्या पाळणाघर चालवू लागल्या. पण तिथे त्या फार काळ रमल्या नाहीत. पुन्हा भारतात परतल्यावर १९८१ साली त्यांनी ‘चंदेरी दुनियेत’ हे आत्मवृत्त लिहिले. परंतु चित्रपटात काम न मिळाल्यामुळे पुढे त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या, ि तेथेच त्यांचे निधन १४ जुलै २००३मध्ये झाले.[३]

‘आज की बात’ (१९५५) 

मराठी चित्रपट संपादन

  • एक होता राजा (१९५२) १. प्रेम आंधळं असतं (१९६१) २.आधी कळस मग पाया (१९६१) ३.पाहू रे किती वाट (१९६३)

हिंदी चित्रपट संपादन

१.वक्त

२.जिंदगी

३.गाईड

४.प्रिन्स

५.गुनाहोंके देवता

६.इन्तकाम

७.दुल्हन एक रातकी

८.औरत

९.मोहब्बत इसको कहते है

१०.दोस्ती

११.पूजा के फूल

१२.काला बाजार

१३.मनमौजी

१४.असली नकली

१५.पलकोंकी छावमें

१६.जीवनमृत्यू



संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ Chitnis, Leela (1990). Chanderi Duniyet (इंग्रजी भाषेत). Shri Vidya Prakashan.
  2. ^ वाटवे, बापू. मराठी विश्वकोश https://vishwakosh.marathi.gov.in/18099/. ६-३-२०२० रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Martin, Douglas (2003-07-17). The New York Times (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331 https://www.nytimes.com/2003/07/17/movies/leela-chitnis-93-an-actress-in-scores-of-bombay-movies.html. 2020-03-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)