सदस्य:ऋतुराज बालिंग स्वामी/20ऑगस्ट कार्यशाळा
अरुणोदय
सन १८६६ मध्ये ठाणे येथे अरुणोदय नावाचे वृतपत्र काशिनाथ धोंडो फडके यांनी चालू केले .ठाणे जिह्यातील हे पहिलेच वृतपत्र होय .अरुणोदय दीर्घकाळापर्यन्त म्हणजे सुमारे ४५ वर्षे चालू होते.अरुणोदयाला मुंबई -पुण्यासारखे सुधारलेले क्षेत्र नव्हते कि इंदुप्रकाश सारखा विद्वान लेखकवर्ग लाभला नाही .तरीसुद्धा एवढ्या दीर्घकाळापर्यन्त तेजस्वी बाण्याने हे वृतपत्र होते. त्या काळी वर्तमानपत्रात बातम्यापेक्षा निबंधवजा लेखावरच भर असे .अरुणोदयातील लेख विद्वत्तेपेक्षा, सखोल विवेचनापेक्षा , जहाल राजकीय मतप्रणाली मांडणारे आढळतात .सन १८८५ मध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसचा जन्म झाला .पण त्याआधी सुमारे २० वर्षे अरुणोदयात राजकारणावर व परकीय सत्तेच्या उच्चाटनासाठी कसे संघटित प्रयत्नव्हावयाला पाहिजेत याविषयीचे विवेचन व मार्गदर्शन वाचले कि आजही कौतुक वाटते .
जहाल मतप्रणालीच्या पुरस्काराप्रमाणे अरुणोदयाचे काही नवीन उपक्रमही उलेखनीय आहेत. ठिकठीकाणी बातमीदार नेमून त्यांच्या करवी बातम्या मिळविण्याच्या सध्याच्या बातमीसंस्थांच्या अभावी त्याकाळी वर्तमानपत्रांना इंग्रजी वृतपत्रातील वा समकालीन इतर वृत्तपत्रातील बातम्या देऊनच वृतसार सजवावे लागे . यादृष्टीने आपल्या स्वतंत्र बातमीदारांकरवी बातम्या मिळविण्याचा अरुणोदयाचा उपक्रम नि:संशय स्पृहणीय होता. आणखी एक उपक्रम अरुणोदयने सुरु केलेला आढळतो .तो म्हणजे नव्या वर्षांच्या पहिल्या अंकात मागील वर्षातील लेखांची आद्यअक्षरनुसार यादी देण्यात येत असे .
अरुणोदयात जहाल राजकीय विचार प्रदर्शित केले जात .परंतु मतप्रचाराच्या दृष्टीने एवढ्यावरच संतुष्ट ना राहता आणखी एक नवीन उद्योग अरुणोदयने सुरु केला .अरूणोदयाच्याच चालकांनी लंडन येथील पंच व तशाचप्रकारच्या गुजराती पत्राप्रमाणे हिंदूपंच नावाचे एक विनोदी पत्र चालू
केले होते .या पत्रात प्प्रचलित राजकीय घडामोडीचे चित्रमय दर्शन वाचकांना घडत असे .चित्रांच्या खाली सूचक वाक्ये घालण्याने चित्रातील विनोद वा प्रचार उठून दिसे .आजच्या व्यंगचित्राप्रमाणे केवळ काही रेखांच्याद्वारे
विशिष्ट अर्थ सूचित करण्याइतकी त्यावेळची चित्रे नसत .परंतु एक अभिनव प्रयत्न म्हणून हिंदुपंच पत्र विशेष लक्ष्यात येते .
अरुणोदयाच्या जहाल विचारसरणीची कदर परकीय सतेच्या अमलांत मुस्कटदाबीने व्हावी यात नवल नाही .सन १९११ मध्ये अरुणोदय पत्र व छापखाना सरकारी रोषाला बळी पडून पत्र बंद पडले .
संदर्भ
संपादन- वृत्तपत्रांचा इतिहास लेखक : वि .कृ. जोशी ,रा .के .लेले ,पृष्ठ क्रमांक :३७६,३७७