सत्यापन ही एखाद्या कागदपत्राची प्रत किंवा नक्कल ही त्याच्या मूळ प्रतीप्रमाणेच आहे याची दिलेली साक्ष आणि घेतलेली जबाबदारी होय.

एखाद्या व्यक्तीची सही सुद्धा सत्यापित केली जाते. म्हणजे सत्यापन करणारा माणूस हे स्वतःच्या जबाबदारीवर सांगतो कि सदर सही, सही करणाऱ्या इसमाने माझ्या समोर केली आहे.

कागदपत्रांचे सत्यापन करण्या साठी राज्य सरकारने विशेष कार्यकारी दंडाधिकारी हे मानद पद नेमले आहे. शाळांचे मुख्याधापक, सरकारी नोकरीतील वर्ग १ अधिकारी यांना सुद्धा सत्यापनाचा अधिकार असतो. ही सेवा फुकट देणे अपेक्षित आहे.

स्व सत्यापन

संपादन

ज्या व्यक्तीची कागदपत्रे आहेत त्या व्यक्तीनेच कागदपत्राच्या नकलेवर सही करून ही कागदपत्रे मूळ प्रती प्रमाणे आहेत याची जबाबदारी घेणे.