सत्यनारायण गोयंका किंवा एस.एन. गोयंका (जन्म : ३० जानेवारी १९२४; - २९ सप्टेंबर २०१३) हे विपश्यना ध्यानपद्धतीचे जागतिक कीर्तीचे बर्मी-भारतीय आचार्य होते. म्यानमारमधील विसाव्या शतकातील विपश्यना आचार्य सयाग्यी यू बा खिन यांनी भारतात आणि इतर देशांत प्रसार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.[] एस.एन. गोयंका यांना भारत सरकारने सामाजिक कार्याबद्दल इ.स. २०१२ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले.

कार्य

संपादन

सत्यनारायण गोयंका इ.स. १९६९ सालच्या जून महिन्यात विपश्यनेच्या आचार्य पदावर विराजमान झाल्यावर त्यांनी मुंबईत पहिले विपश्यना शिबिर ३ ते १४ जुलै इ.स. १९६९ या दिवसांत एका धर्मशाळेत भरविले.[] त्यांनी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे इ.स. १९७६ साली "विपश्यना विश्व विद्यापीठाची" स्थापना केली. इ.स. १९८५ साली त्यांनी इगतपुरीतच विपश्यना संशोधन केंद्राचीही स्थापना केली.[][]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ परंपरेतील विपश्यना ध्यानपद्धतीचा
  2. ^ "विपश्यना म्हणजे काय?". ७ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
  3. ^ "विपश्यना गुरु एसएन गोयंका नो मोअर" (इंग्रजी भाषेत). ७ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
  4. ^ "विपश्यना पायोनियर एसएन गोयंका इज डेड" (इंग्रजी भाषेत). ७ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन