सखाराम गणेश देऊसकर
सखाराम गणेश देऊसकर (जन्म - १७ डिसेंबर १८६९, करोग्राम मृत्यू - २३ नोव्हेंबर १९१२) हे क्रांतिकारक तसेच लेखक होते. [१]
जीवन
संपादनदेऊसकर यांनी उपजीविकेसाठी कलकत्त्याच्या साप्ताहिक हितवादमध्ये नोकरी केली.
भगिनी निवेदिता यांच्याकडून इंग्रजांकडून भारतीयांची आर्थिक पिळवणूक कशी होते, हे समजल्यानंतर 'भारताचे अर्थशास्त्र' हा विषय ते क्रांतिकारकांना शिकवत असत.[२]
श्रीशिवछत्रपतींचा उत्सव
संपादनश्रीशिवछत्रपतींचा उत्सव बंगाल प्रांतात सुरू करण्याची मूळ कल्पना देऊसकर यांची होती. वंगदेश हा भवानीमातेचा उपासक आणि श्रीशिवछत्रपती देखील भवानी मातेचे निस्सीम भक्त हा अनुबंध लक्षात घेऊन बंगाल प्रांतामध्ये श्रीशिवछत्रपतींचा उत्सव सुरू करण्याची कल्पना यांनी मांडली. दि. ०४ जून १९०३ रोजी या उत्सवास प्रारंभ झाला. या उत्सवासाठी महाराष्ट्रातून लोकमान्य टिळक आणि डॉ.बाळकृष्ण शिवराम मुंजे, बिपिनचंद्र पाल इत्यादी मंडळी उपस्थित होती. रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतून त्यांनी अखंड भारताचे रम्य चित्र उपस्थितांसमोर उभे केले. देऊसकर यांनी टागोरांकडून शिवाजी-उत्सव नावाची कविता लिहून घेतली. लोकमान्य टिळक यांनी या निमित्ताने मराठे आणि बंगाली यांच्या अनुबंधावर काही भाष्य केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या आखणीमध्ये भगिनी निवेदिता यांचा मोठा वाटा होता.[२]
कार्य
संपादनअहमदाबाद, मुंबई, वाराणसी येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनातून त्यांनी प्रतिकार, बहिष्कार, ग्रामीण विकास, राष्ट्रीय शिक्षण या तत्त्वांचा प्रचार केला. (१९०२-१९०५) परिस्थितीनुसार अप्रत्यक्ष प्रतिकार किंवा प्रत्यक्ष क्रांती हे त्यांचे साधनमार्ग होते. [३]
लेखन
संपादन- 'स्वदेशेर कथा' हे बंगाली पुस्तक प्रकाशित.[२] हे पुस्तक त्यांनी श्रीअरविंद घोष यांच्या सुचनेनुसार लिहिले. अनेक तरुण हे पुस्तक वाचून क्रांतिकार्याकडे वळले. स्वदेशी आणि बहिष्कार या चळवळीत सहभागी झाले. हे लक्षात आल्यावर ब्रिटिश सरकारने या पुस्तकावर बंदी घातली. [३]
- 'शिवाजीर कथा' हे शिवाजी महाराजांचे बंगालीमध्ये चरित्र लिहिले. या मध्ये त्यांनी प्रथमच स्वराज्य या शब्दाचा मंत्र प्रथम उद्घोषित केला.[२][३]
- बंगाली भाषेत १२ पुस्तके आणि ४८ लेख प्रकाशित केले.