सकळ ही मराठी भाषेची उपलिपी म्हणून संबोधली जाते. मराठी भाषेच्या सुवर्णकाळात सकळ लिपीचा उगम झाला. सकळ लिपी कर्ता म्हणजे सह्याद्रीवर्णन ग्रंथाचे कर्ते रवलोबास होय. ते महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावचे. रवळोबास हे हिराईसा यांचे शिष्य होते. त्यांनी तयार केलेल्या सकळ लिपीला नागरी लिपी म्हणून सुरुवातीला संबोधले जायचे परंतु सकळ आणि सकळीत हीच नावे पुढे प्रामुख्याने दृढ झाली. हरिबास आणि सोंगोबास यांच्या अन्वस्थळामध्ये ‘मग हिराइसाचिया रवळोबासाची नागरलिपी लिहून दोन प्रती केलिया’ असा उल्लेख आलेला आहे. तर कृष्णमुनींच्या अन्वस्थळामध्ये ‘लिपकृत्य त्याचेः नागरिक’ अशी नोंद आढळून येते. तिसरा अर्थ सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या सर्व अनुयायांना ही सकळ लिपी मान्य असून हे सर्व शास्त्र संकलनाचे काम या लिपितून होत होत आहे. म्हणून सकळ लिपी असे म्हणले गेले आहे. असा उल्लेख सह्याद्रीवर्णन नावाच्या ग्रंथात वि.भी.कोलते यांनी प्रस्तावनेत केला आहे.[]

सकळ लिपी

सुरुवातीला या संप्रदायामध्ये ही एकच लिपी अस्तित्वात होती. परंतु महानुभाव वर्ग हा बुद्धिजीवी लोकांचा वर्ग होता. त्यांच्या आचरणाची आणि विचारांची बाजू ही फार कुशलतेची होती. म्हणून पुढे अनेक विद्वानांनी स्वतःची स्वतंत्र लिपी बनविण्याची प्रवृत्ती दृढ होत गेली.त्यामुळे सकळीलिपीप्रमाणे आणखी काही लिप्या याच एकमेव संप्रदायात निर्माण झाल्या. सुंदरी लिपी, पारमांडल्य लिपी, अंकलिपी, शून्यलिपी, सुभद्रालिपी, श्रीलिपी, वजलिपी, मनोहरालिपी, कवीशेरी लिपी इत्यादी लिप्या निर्माण झाल्या परंतु बरेच ग्रंथ प्रारंभीच्या सकळी लिपीतच बांधेले गेले आहे. अर्थात सकळी लिपीचा संकेतच पंथात विशेष रूढ आहे. क्वचित बाइंदेशकर किंवा तळेगावकर यांसारख्या परंपरांनी अनुक्रमे सुंदरी लिपी व अंकलिपी वापरल्या आहेत.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ पठाण, यु. म. (१९८२). महानुभावांच्या सांकेतिक लिप्या-निर्मितिमीमांसा. मुंबई: श्रीचकधरदर्शन, मुंबई.

सकळ लिपी प्रशिक्षण कार्यशाळा महानुभाव साहित्य व शैक्षणिज प्रतिष्ठान आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांच्या वतीने सात दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.