Copyright-problem paste.svg***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***

एक मूल्यवर्धक प्रक्रिया. ‘संस्कार’ व ‘संस्कृती’ हे शब्द सम्यक्त्वदर्शक ‘सम्’ हा उपसर्ग आणि ‘कृ’ हा धातू यांच्यापासून बनले आहेत. ‘सम् +कृ’ चा व्युत्पत्त्यर्थ ‘चांगले रूप देणे’, ‘शुद्ध करणे’, ‘सुंदर करणे’, ‘पवित्र करणे’ असा बहुविध आहे. मनुष्य, मनुष्येतर प्राणी, वनस्पती आणि निर्जीव वस्तू यांचा मूळ स्वभाव म्हणजे प्रकृती. तिच्यात होणारा बिघाड म्हणजे विकृती आणि ज्या क्रिया-प्रक्रियांद्वारा मूळ स्वभावात बिघाड होऊ न देता, उलट चांगले रूप दिले जाते, त्यांना ‘संस्कार’ म्हणतात व त्या वस्तूला ‘सुसंस्कृत’ किंवा ‘सुसंस्कारित’ म्हणतात. लाकूड, पाषाण, धातू इ. संस्कार्य वस्तू कापणे, ठोकणे, तापविणे, घासणे, कोरणे इ. स्थूल भौतिक क्रिया-प्रक्रिया-संस्कार करून, त्यांना सुबक आकार देऊन त्यातून शिल्प, अलंकार, उपयुक्त वस्तू व उपकरणे, शोभेच्या वस्तू बनविल्या जातात. अशा वस्तू आता केवळ प्राकृतिक न राहता, त्या सांस्कृतिक विश्वाचा भाग बनतात; ती संस्कृतीची प्रतीके बनतात. उदा., भगवा, पांढरा व हिरवा या तीन रंगांच्या समांतर पट्ट्या आणि त्यांमध्ये अशोकचक्र असा रंगवलेला कापडाचा तुकडा आता केवळ कापडाचा तुकडा न राहता भारताचा पवित्र राष्ट्रध्वज बनतो. वनस्पती, प्राणी यांच्यावर जैविक पातळीवर सूक्ष्म संस्कार करून त्यांच्यावर सांस्कृतिक लेणे चढविले जाते. उदा., झाडांचे बोन्साय, गुन्हे-अन्वेषण खात्यातील श्वानपथक किंवा सर्कशीत काम करणारे वन्यप्राणी. माणसावरील संस्कारांना सूक्ष्म मानसिक परिमाण लाभते. शारीरिक व्यायाम, कसरत इत्यादींद्वारा शरीरसौष्ठव, वस्त्र व अलंकारांनी सभ्यता आणि सौंदर्य जोपासले जाते. वासना, प्रवृत्ती, नैसर्गिक आवड-निवड यांना भाषा-साहित्य, कला, कायदा, नीती, धर्म इ. संस्कारांद्वारा ‘ चांगले वळण ’ लावले जाते; माणसात सद्भिरूची निर्माण केली जाते; विवेकजागृती केली जाते. अशा तऱ्हेने संस्कृती व सभ्यतेच्या विविध अंगांशी निगडित विविध प्रकारचे संस्कार असतात. संस्कार आणि संस्कृती या दोन संकल्पना समकक्ष आहेत. संस्कारांमध्ये धार्मिक संस्कारांना अनन्यसाधारण महत्त्व दिले जात असले, तरी संस्कार ही संकल्पना धार्मिक संस्कारांपुरतीच मर्यादित केल्यास ‘ संस्कार ’ शब्दाचा अर्थसंकोच होतो. [२]


माणूस हा बुद्धीशाली प्राणी असल्यामुळे ज्ञानार्जन ही बौद्धीक गरज आहे. परंतु विचारसंक्रमण किंवा ज्ञानदान ही बौद्धीक-वैचारिक प्रक्रिया आणि संस्कारप्रक्रिया यांत गुणात्मक भेद आहे. शास्त्रज्ञान प्राप्त झालेली व्यक्ती ज्ञानी, विद्वान किंवा पंडित होते. तंत्रज्ञान व विविध कौशल्ये आत्मसात केलेली व्यक्ती निष्णात, कुशल तंत्रविशारद होते. परंतु धार्मिक, नैतिक, साहित्यिक, सौंदर्यात्मक किंवा कलात्मक संस्कारांतून माणसाच्या वृत्तीला वळण लागते. व्यक्ती सत्प्रवृत्त, सुसंस्कृत, सूज्ञ होते. तिच्यात सद्‌भिरूची निर्माण होते. ती सुजाण नागरिक होते.

***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***
सं म्हणजे चांगले आणि कृ म्हणजे करणे. संस्कार म्हणजे ज्याच्यायोगे मानवाच्या जीवनाची गुणवत्ता वाढवली जाते असे क्रिया-कलाप.

योग्यतां च आदधाना:क्रिया: संस्कारा: इति उच्यते|(तन्त्रवार्तिक) योग्यता प्राप्त करून देणा-या क्रियांना संस्कार असे म्हटले जाते.

संदर्भसंपादन करा

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले
  2. ^ अंतरकर, शि. स.;; कुलकर्णी, अ. र. ((पुस्तक ज्या वर्षी छापले गेले ते वर्ष)). मराठी विश्वकोश (मराठी मजकूर) ((पुस्तकाची प्रकाशन आवृत्ती) आवृत्ती.). महाराष्ट्रराज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई. पान क्रमांक ? Extra |pages= or |at= (सहाय्य). आय.एस.बी.एन. (पुस्तकाचा ८-आकडी आय. एस. बी. एन. क्रमांक उदा.-11111111) Check |isbn= value (सहाय्य). ३१, मार्च २०१७ दुपारी १५ २० रोजी पाहिले. "पुस्तकातील विशिष्ट वाक्य, ज्याचा संदर्भ घेतला आहे : "ज्या क्रिया-प्रक्रियांद्वारा मूळ स्वभावात बिघाड होऊ न देता, उलट चांगले रूप दिले जाते, त्यांना ‘संस्कार’ म्हणतात";"अशा वस्तू आता केवळ प्राकृतिक न राहता, त्या सांस्कृतिक विश्वाचा भाग बनतात; ती संस्कृतीची प्रतीके बनतात. उदा., भगवा, पांढरा व हिरवा या तीन रंगांच्या समांतर पट्ट्या आणि त्यांमध्ये अशोकचक्र असा रंगवलेला कापडाचा तुकडा आता केवळ कापडाचा तुकडा न राहता भारताचा पवित्र राष्ट्रध्वज बनतो.""  Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिना= ignored (सहाय्य)