पाण्याच्या रेणूची आकृती - ऑक्सिजन अणूच्या दोन संयुजा दोन हायड्रोजन अणूंशी बंध बनवतात.

संयुजा[१] (इंग्लिश: Valence / Valency, व्हॅलन्स/ व्हॅलन्सी ;) म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या अणूची दुसऱ्या अणूशी संयोग पावण्याची क्षमता मोजण्याचे मान असते. एखादा अणू अन्य एखाद्या अणूशी किंवा अन्य अनेक अणूंशी किती संयुजाबंध बनवू शकतो, तितकी त्याची संयुजा असते. उदाहरणार्थ, जो अणू एका हायड्रोजन अणूशी बांधला जाऊ शकतो, तो एकसंयुजी असतो; तर जो अणू दोन हायड्रोजन अणूंशी बांधला जाऊ शकतो, तो द्विसंयुजी असतो. जो अणू दुसऱ्या कोणत्याच अणूशी जोडला जाऊ शकत नाही, तो अणू शून्य संयुजी असतो.

संदर्भसंपादन करा

  1. ^ वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा (मराठी मजकूर). महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ. इ.स. १९६९. पान क्रमांक ३१०. 


बाह्य दुवेसंपादन करा