संयुक्त गर्भनिरोधक गोळी
या गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि नवीन प्रकारच्या प्रोजेस्टेरॉनचा वापर केलेला असतो.
इतिहास
संपादनकार्यप्रणाली
संपादनप्रोजेस्टेरोन व एस्ट्रोजेन यांचे मिश्रण गोळीरूपात दिल्यास ऋतुचक्रात अंडविमोचन (अंडे बाहेर पडण्याची क्रिया) होत नाही. या गोळ्यांत प्रोजेस्टेरोन आणि एस्ट्रोजेन यांचे गुणधर्म असलेली द्रव्ये वापरली असतात. अंडविमोचन थांबते ते एस्ट्रोजेनमुळे व प्रोजेस्टेरोनमुळे. गोळ्या थांबताच ऋतुस्त्राव ताबडतोब सुरू होतो. गोळ्या घेताना गर्भाशयाच्या अंतःस्तराची अप्राकृत वाढ होते व तेथील स्रावातील बदल शुक्राणूंच्या गर्भाशयातील प्रवेशात अडथळा आणतात आणि कदाचित गर्भधारणा झालीच तर गर्भाचे गर्भाशयात रोपण होऊ देत नाहीत.
वापराची पद्धत
संपादनउपयोग
संपादनसंयुक्त गर्भनिरोधक गोळी योग्यरीत्या वापरल्यास गर्भारपण रोखण्यास या गोळ्या ९५ ते ९९.९ टक्के परिणामकारक असतात.
वापर न करण्याच्या परिस्थिती
संपादन- वय ३५ वर्षापेक्षा जास्त असेल
- धुम्रपान करणाऱ्या स्त्रिया
- रक्तातील गुठळ्या किंवा गर्भाशयाच्या कर्करोगाची पार्श्वभूमी असल्यास, या गोळ्यामुळे रक्तातील गाठी आणि धमन्यांतील गाठी वाढतात. यामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.