संभाजी व्यंकटराव पाटील यांचा जन्म ११ जानेवारी १९७४ मध्ये सुगांव ता.मुखेड,जि. नांदेड येथे झाला. ते सद्या राजर्षी शाहु महाविद्यालय, लातूर येथे मराठी विषयाचे प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत. त्यांनी एम.ए. (मराठी), केल्यानंतर पीएच.डी. पदवीसाठी डॉ.केशव तुपे यांच्या मार्गदर्शनाने राजन गवस यांच्या समग्र साहित्यातुन व्यक्त झालेल्या भूमिनिष्ठ जीवनजाणिवांचा चिकित्सक अभ्यास या विषयावर संशोधन करून डॉ. बाबसाहेब आंबेडकर विद्यापीठ, औरंगाबाद कडे प्रबंधसादर केला. त्यांनी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बदनापूर, जि. जालना येथे २००१ ते २००९, मराठी विभागप्रमुख म्हणुन काम केले. २००९ पासून राजर्षी शाहु महाविद्यालय, लातूर येथे मराठी विषयाचे साहाय्यक प्राध्यापक म्हणुन रुजू झाले. २०१५ पासून सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणुन, सद्या प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणुन काम करत आहेत.

चित्र:संभाजी पाटील.jpg
संभाजी पाटील

प्रकाशित साहित्य

संपादन

संशोधन

संपादन
  • 'राजन गवस यांचे साहित्य : आशय आणि आकलन', सुर्यमुद्राप्रकाशन, नांदेड (२०१७)

संपादने

संपादन
  • 'एकविसावे शतक आणि मराठी साहित्य'
  • 'लातूर : वसा आणि वारसा' (सदस्य संपा.)
  • 'सत्यशोधन', स्मरणिका, सत्यशोधकी साहित्यसंमेलन, लातूर (सदस्य संपा.)
  • 'गरूडझेप', शिवछत्रपी शिक्षण संस्था, लातूर सुवर्ण महोत्सवी वर्ष स्मरणिका (सदस्य संपा.)
  • 'विचारशलाका', त्रैमासिक, लातूर, एप्रिल- डिसेंबर जोड अंक, २०१५ (अतिथी संपा.)

नियतकालिकांचे संपादन

संपादन
  • 'भूमी' लोकसाहित्य, लोककला व लोकसंस्कृतीला वाहिलेले त्रैमासिकाचे कार्यकारी संपादक म्हणुन - २००७ ते २०१७ या कार्यकाळात काम केले.

पुरस्कार

संपादन
  • जयक्रांती साहित्य प्रेरणा पुरस्कार -२०१९