संध्या (वैदिक)
संध्या किंवा संध्यावंदना हा हिंदू धर्मातील ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रिवर्णीयांनी करावयाची एक उपासना आहे.दिवस व रात्र यांच्या संधीकाळात केली जाणारी उपासना म्हणून याला संध्या म्हणतात. या उपासनेची सुरुवात उपनयनानंतर केली जाते. प्रतिदिन प्रातःकाळ, माध्यानकाळ व सायंकाळ अशा तिन्ही काळी ही उपासना केली जाते. ही उपासना आपल्या गुरूकडून शिकून घ्यावी लागते. अर्घ्यदान, गायत्री जप व उपस्थान ही संध्येतील मुख्य कर्मे आहेत. संध्येमध्ये गायत्री देवी, सूर्य, अग्नी, वरुण इ. देवांची उपासना केली जाते.
हा लेख संध्या नामक हिंदू धर्मातील दैनंदिन आचार याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, संध्या.
संध्या उपासनेचे टप्पे
संपादन- भस्मधारण
- आचमन
- प्राणायाम
- संकल्प
- प्रथम मार्जन
- मंत्राचमन
- द्वितीय मार्जन
- अघमर्षण
- अर्घ्यदान
- आसन
- न्यास
- गायत्रीध्यान
- उपस्थान
- दिग्वंदन
- प्रदक्षिणा
- अभिवादन
- विसर्जन
साधने
संपादन
हे सुद्धा बघा
संपादनबाह्य दुवे
संपादन- संध्याविधी दिलेले संकेतस्थळ विदागारातील आवृत्ती
- पोथी दिलेले संकेतस्थळ विदागारातील आवृत्ती