संजीवन (मराठी नियतकालिक)
स्थापना
संपादनसंजीवन हे मराठी त्रैमासिक आहे. इ.स. १९५० पासून ते काही अपवाद वगळता नियमाने प्रकाशित होत असते. श्री.भा.द.लिमये आणि श्रीमती विमल भिडे हे दोघे या अंकाचे संस्थापक आणि संपादक होते. श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी येथून प्रकाशित होणारे हे त्रैमासिक योगी श्रीअरविंद ऊर्फ अरविंद घोष आणि श्रीमाताजी ऊर्फ मीरा अल्फासा यांच्या विचारांना वाहिलेले आहे. या त्रैमासिकाला शुभारंभी श्रीमाताजी यांचे आशीर्वाद लाभले होते.[१]
इतिहास
संपादनइ.स १९५० ते १९५४ या कालावधीत ते पाक्षिक होते असे आढळते. 'जीवनाच्या सर्वांगीण विकासार्थ पाक्षिक' असे त्यावर लिहिलेले आढळते. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्माsमृतं गमय हे त्याचे घोषवाक्य होते.
मासिकाचे स्वरूप
संपादनश्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या इंग्रजी व फ्रेंच साहित्याचा अनुवाद यामध्ये केलेला आढळतो. तसेच अन्य लेखकांनी श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या चरित्रावर आधारित, त्यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित केलेले लिखाण देखील यामध्ये प्रसिद्ध केले जाते.
संपादक
संपादनमासिकाच्या प्रारंभापासून २००५ पर्यंत श्री.भा.द.लिमये हे संपादक होते. २००५ ते २०१० या कालावधीत श्रीमती विमल भिडे या संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. नंतर श्री.प्रभाकर नागराज यांनी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
बाह्य दुवा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ सुहासिनी देशपांडे (जानेवारी २०२३). श्रीअरविंद आणि महाराष्ट्र. पुणे: श्रीअरविंद सोसायटी, मुंबई शाखा.