संजय कुलकर्णी (मूत्रविकारतज्ज्ञ)

डॉ. संजय कुलकर्णी हे एक मूत्रविकारतज्ञ आहेत. तीन दशकांहून अधिक काळ ते या क्षेत्रात आहेत. ​युरोलॉजिकल तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये डॉ. कुलकर्णी यांनी भरीव योगदान दिले असून, ​ते ​दी जेनायटो-युरिनरी रिकन्स्ट्रक्टिव्ह सोसायटीचे पहिले भारतीय अध्यक्ष होते. डॉ. कुलकर्णी यांनी विकसित केलेली शस्त्रक्रिया कुलकर्णीज् टेक्निक ऑफ युरेथ्रल रिकन्स्ट्रक्शन या नावाने ​​जगभरात ​ओळखली जाते.

‘टु रेकग्नाइज दी बेस्ट टॅलेंट्स इन एन्करेजिंग दी डेव्हलपमेंट ऑफ स्पेशालिटीज् इन डिफरंट ब्रँचेस इन मेडिसिन’ या विभागातला २०१६ सालचा डॉ. बी.सी. रॉय राष्ट्रीय पुरस्कार डॉ. कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. जगभरातील वैद्यकीय क्षेत्रात हा पुरस्कार प्रतिष्ठेचा समजला जातो. ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’तर्फे दिला जाणारा हा पुरस्कार कुलकर्णी यांना एक जुलै २०१७ च्या ‘डॉक्टर्स डे’च्या दिवशी भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.