संगीता पेंडुरकर केलॉग इंडियाच्या व्यवस्थापक संचालिका आहेत. पॅक्ड गुड्स, फार्मास्युटिकल्स आणि वित्तसेवा या तीन क्षेत्रातल्या मार्केटिंग, सेल्स आणि जनरल मॅनेजमेंटचा २६ वर्षाचा अनुभव त्यांना आहे. फॉर्च्युनच्या मोस्ट पॉवरफुल विमेन इन बिझनेसच्या यादीत २०११ ते २०१४ अशी सलग चार वर्ष त्यांच नाव आहे. इंपॅक्टच्या '५० मोस्ट इनफ्लुएन्शिअल विमेन इन मीडिया टायझिंग अँड अडव्हर्टायझिंग' या यादीतही २०१२ ते २०१५ या कालावधीत त्या चमकल्या आहेत.[१]

संगीता पेंडुरकर
जन्म मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
धर्म हिंदू

कामाचे स्वरूप संपादन

संगीता यांनी नोवार्टिस, युनिलिव्हर, एचएसबीसी आणि कोकाकोला अशा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी भारतात आणि विदेशातही काम केलं आहे. सध्या त्या FICCIच्या फूड प्रोसेसिंग कमिटीच्या अध्यक्ष आहेत. हे स्थान भूषवणाऱ्या त्या पहिला महिला आहेत. २०१३-१४ मध्ये या कमिटीच्या त्या सह-अध्यक्ष होत्या. पाच भावंडांमध्ये सर्वात धाकट्या असलेल्या संगीता यांना आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढेचालू ठेवण्याची इच्छा होती, आणि त्यासाठी त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता. पण हे शक्य झालं नाही, तेव्हा त्यांनी संपूर्ण वेगळी वाट निवडली. आपला प्रवास त्यांनी एकाच क्षेत्रापरता मर्यादित न ठेवता, वेगवेगळ्या संस्थात्मक संस्कृतीशी स्वतःला जुळवून घेता येईल, अशी वाटचाल केली. प्रत्येक ठिकाणी त्या-त्या वातावरणाच्या गरजा लक्षात घेत त्यांनी अतिशय मनःपूर्वक स्वतःला जुळवून घेतलं. कुटुंबात सर्वात लहान असल्यामुळे आईवडील आणि भावंडांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. आणि आपल्या यशाचं बव्हंशी श्रेय त्या कुटुंबीयांनाच देतात. पतीचा- संदीप पेंडुरकर यांचा आणि जवळच्या मित्रमैत्रिणींचा खंबीर आधारही आपल्या यशामागे असल्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख त्या करतात.

आवड संपादन

संगीता यांना वाचन आणि संगीताची आवड आहे. शिवाय, त्या कला आणि ॲटिक्स संग्राहकही आहे.

संदर्भ संपादन

  1. ^ किडवाई, नैना लाल (2016). पुणे. p. 254. ISBN 978-93-86204-06-6. Missing or empty |title= (सहाय्य)