संगणकीय विषाणू

संगणकीय मंत्र जो एक संगणक हून दुसऱ्या संगणाकात स्वतःला प्रतिकृत करू शकतो.
(संगणकी़य विषाणू या पानावरून पुनर्निर्देशित)

संगणकीय विषाणू (अन्य नावे: संगणक विषाणू ; इंग्लिश: computer virus (काँप्युटर व्हायरस)) ही संगणकामध्ये घुसून संगणकाच्या सॉफ्टवेरला हानिकारक संसर्ग पोचवू शकणारी संगणकीय प्रणाली असते. एखादा प्रदुषित प्रोग्राम जर तुमच्या संगणकात टाकला गेला तर त्यासोबत हे संगणकीय विषाणू पसरतात. यामुळे फाइल्स खराब होऊ शकतात. दरवेळी संगणक सुरू झाल्यावर किंवा प्रोग्राम वाचला गेल्यावर संगणकीय विषाणू पसरत जातो. बऱ्याचदा संगणकीय विषाणू ही संज्ञा अ‍ॅडवेअर, स्पायवेअर या प्रकारांतल्या संगणकात बिघाड न करणाऱ्या प्रणालींसकट सर्वच दुष्ट प्रणालींसाठी ढोबळपणे वापरली जाते. मात्र अचूकपणे बोलायचे झाल्यास एखाद्या एक्झिक्यूटेबल प्रोग्रामाच्या रूपाने जालावरून अथवा काँपॅक्ट डिस्क, फ्लॉपी डिस्क, डीव्हीडी अथवा यूएसबी ड्राइव्ह इत्यादी साठवणुकीच्या माध्यमांमार्फत एका संगणकापासून दुसऱ्या संगणकाला बाधा पोहोचवू शकणारी प्रणाली संगणकीय विषाणू मानली जायला पाहिजे. संगणकावर सुरक्षेसाठी संगणकी़य विषाणू प्रतिबंधक(अँटि व्हायरस) स्पायवेअरफायरवॉल असलीच पाहिजे.

संगणकीय विषाणू कुठे रहातात यावरूनही त्यांना नावे देण्यात आलेली आहेत. काही संगणकीय विषाणू एखाद्या प्रोग्रामला जोडलेले असतात. त्याला पॅरासिटिक संगणकीय विषाणू म्हणतात, सर्वसामान्यत: वापरले जाणारे व्हायरस विघातक प्रोग्राम्स म्हणजे - ट्रॉजन हॉर्स (Trojan horse), लॉजिक बॉम्ब (Logic Bomb) वर्म (Worm) वर्म म्हणजे स्वतःच स्वतःच्या अनेक प्रती तयार करणारा प्रोग्राम होय. जेव्हा जेव्हा हा प्रोग्राम सुरू केला जातो तेव्हा तेव्हा या प्रोग्रामच्या अनेक प्रती तयार होत जातात व त्यामुळे ऑपरेटींग सिस्टिममध्ये अडथळा येतो. ट्रॉजन हॉर्स हा प्रोग्राम काही विघातक कोड तुमच्या संगणकापर्यंत आणून पोहचवण्याचे काम करतो. सुरुवातीला असा प्रोग्राम उपयुक्त वाटतो; पण हळूहळू तो संगणकातील माहिती खराब करण्यास सुरुवात करतो लॉजिक बॉम्ब प्रोग्रामसोबत किंवा ऑपरेटींग सिस्टिमसोबत राहतात आणि विशिष्ट वेळी आपले कार्य सुरू करतात. उदा. एखादी विशिष्ट तारीख किंवा विशिष्ट अंक इ. आल्यास या व्हायरसचे काम सुरू होते.

उपलब्धता

संपादन

मोफत मिळणारी संगणकी़य विषाणू प्रतिबंधक प्रणाली (अँटि व्हायरस) वापरताना ती विश्वासार्ह स्थळावरून उतरवलेली असावी.

संगणकीय विषाणू लक्षणे

संपादन
  • प्रोग्राम सुरू होण्यास जास्त वेळ लागतो किंवा संगणकच सुरू होत नाही.
  • फाइल्स नाहिशा होतात.
  • स्क्रीनवर असंबद्ध सूचना/अक्षरे/वाक्ये येतात.
  • फाइल्सची नावे बदलतात.
  • संगणक वारंवार स्तब्ध (हँग) होतो.
  • प्रोग्राम फाइलवर परिणाम होतो.

संगणकीय विषाणूपासुन बचाव

संपादन

संगणकीय विषाणू पासून बचाव करण्यासाठी संगणकात काही प्रतिसंगणकीय विषाणू प्रोग्राम टाकावे लागतात, John McCafe, PC. Tools, Nortonutility इ. प्रोग्राम यासाठी वापरले जातात. खोडल्या गेलेल्या फाइल्स परत आणणे, फ्लॉपी व हार्ड डिस्कमध्ये सुधारणा करणे, फ्लॉपी किंवा हार्ड डिस्क फॉरमॅट करावी लागल्यास पूर्वीचा डेटा परत मिळविणे इ. कामात प्रतिसंगणकीय विषाणू प्रोग्राम मदत करतात. याशिवाय फ्लॉपी संगणकात टाकल्यानंतर ती तपासली जाते व त्यात काही संगणकीय विषाणू असल्यास तो काढून टाकला जातो.

कार्य पद्धती

संपादन

प्रत्येक संगणकी़य विषाणू प्रतिबंधक हे चालू संगणकाच्या पार्श्वभूमीवर काम करत असतात. या कारणाने त्यांच्यासाठी प्रोसेसर व रॅम (स्मॄती)चा काही भाग वापरला जातो. संगणकी़य विषाणू प्रतिबंधक प्रणालीच्या जोडण्या (अपडेट) उतरवून घेतांना हा वापर वाढतो. मात्र अशा वापराचे प्रमाण प्रणालीगणिक कमी जास्त असते.

संगणकी़य विषाणुप्रतिबंधकांची(Antivirus) प्रमुख नावे

संपादन
  • बीटडिफेंडर
  • मॅकॅफी
  • एव्हीजी - याची एखादी आवृत्ती, मोफत, विकत किंवा भाड्याने मिळते
  • नॉर्टन
  • सोफोस
  • अ‍ॅव्हास्ट
  • अ‍ॅव्हिरा
  • कास्पारस्की
  • इस्कॅन
  • कॉमकास्ट
  • मॅलेशिअस सॉफ्टवेर रिमूव्हल टूल
  • कॉम्बोफिक्स
  • मॅलवेअर बाईट्स
  • स्पायवेअर डॉक्टर - याची प्रत मोफत मिळते
  • अ‍ॅडअवेअर - याची प्रत मोफत मिळते
  • क्विकहेअल टोटल & इंटरनेट सिक्युरिटी

बाह्य दुवे

संपादन