षोडशोपचार पूजा

(षोडशोपचार या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय संस्कृतीमध्ये पूजा विधीत सोळा उपचार प्रचलित आहेत. अश्या पूजेला षोडशोपचार पूजा असे म्हणतात.[१]

  • सोळा उपचार
  1. आवाहन - देवदेवतांना पूजेसाठी आमंत्रण करणे.
  2. आसन - त्यांना स्थानापन्न होण्यासाठी आसन देणे.
  3. पाद्य - त्यांचे पाय धुणे.
  4. अर्घ्य - फूल, गंथ, अक्षता आणि पाणी आचमन पळीत एकत्र करून सन्मानपूर्वक अर्पण करणे.
  5. आचमनीय - देवाला पिण्यासाठी पाणी देणे.
  6. स्नान - देवदेवतांना अंघोळ घालणे.
  7. वस्त्र - त्यांना वस्त्र नेसवणे.
  8. यज्ञोपवीत - देवांना जानवे घालणे.
  9. अनुलेपन - त्यांच्या कपाळावर गंध लावणे.
  10. पुष्प - त्यांना फुले वाहणे.
  11. धूप - त्यांना उदबत्ती ओवाळणे.
  12. दीप - त्यांना निरांजन ओवाळणे.
  13. नैवेद्य - त्यांना नैवेद्य दाखविणे.
  14. नमस्कार - त्यांना वंदन करणे.
  15. प्रदक्षिणा - देवदेवतांना भोवती फेरी मारणे.
  16. विसर्जन - मंत्रपुष्पांजली म्हणून पूजाविधी समाप्त करणे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन