श्रीलता बाटलीवाला या सामाजिक कार्यकर्त्या, महिला हक्कांचे पुरस्कर्त्या, विद्वान, आणि महिलांच्या सक्षमीकरणावरील अनेक पुस्तकांच्या लेखिका आहेत. या बेंगळुरू (पूर्वी बंगलोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या), कर्नाटक, भारत येथील राहणाऱ्या आहेत. इ.स. १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ती "ग्रासरूट ऍक्टिव्हिझम, वकिली, अध्यापन, संशोधन, प्रशिक्षण," अनुदान मिळवणे आणि अभ्यासपूर्ण स्वरूपाची कामे जोडण्यात गुंतलेल्या आहेत.[]

माहितीचौकट व्यक्ती
२०११ मधील फोटो
जन्म बंगळुरु, भारत
पेशा सामाजिक कार्यकर्त्या, महिला हक्कांचे पुरस्कर्त्या, विद्वान आणि लेखिका
कारकिर्दीचा काळ १९६० पासून
प्रसिद्ध कामे महिला सक्षमीकरण

इ.स. १९८० च्या दशकाच्या मध्यात झालेल्या महिला सक्षमीकरणाची व्याख्येबाबत बाटलीवाला यांच्या मते "कल्याण, उन्नती, समुदाय सहभाग आणि गरिबी निर्मूलन" अशी संज्ञा आहे.[]

बाटलीवाला यांच्या म्हणण्यानुसार भारतात महिला सक्षमीकरण कायदे सहज मंजूर केले जातात परंतु त्याची अंमलबजावणी उशिरा होते. इजिप्तमधील तत्सम परिस्थितीशी तुलना करु शकतो. महिलांच्या चळवळींना "संघटित आणि एकत्रीकरण करण्यावर प्रतिकूल प्रतिक्रिया" पूर्वीच्या तुलनेत वाढत असल्याचेही त्यांचे मत आहे.[]

चरित्र

संपादन

बाटलीवाला यांचा जन्म भारतातील बेंगळुरू येथे झाला. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथून सामाजिक कार्यात मास्टर ऑफ आर्ट्स (एमए) पदवी प्राप्त केली.[] इ.स. १९७० च्या उत्तरार्धापासून ते १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी स्त्रीवादी चळवळीला चालना देण्यासाठी, स्त्रियांमध्ये नेतृत्वगुण निर्माण करण्यासाठी, लिंग-संवेदनशील समस्यांचे निरीक्षण आणि मूल्यांकन आणि महिला कार्यकर्त्यांचा समूह तयार करण्यासाठी भारतात काम केले. चार संस्था आणि दोन तळागाळातील स्त्रीवादी मोहिमा स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. १९९० च्या मध्यापासून त्यांनी बंगळुरूबाहेर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम केले आहे. फोर्ड फाउंडेशन (१९९७ - २०००), न्यू यॉर्क सिटी सह कार्यक्रम अधिकारी म्हणून "आंतरराष्ट्रीय नागरी समाज, विशेषतः आंतरराष्ट्रीय तळागाळातील चळवळींवर" नानफा संस्थांसाठी हौसर सेंटरमधील सिव्हिल सोसायटी रिसर्च फेलो, हार्वर्ड विद्यापीठात आणि महिला पर्यावरण आणि विकास संस्थेच्या मंडळाच्या अध्यक्षा, न्यू यॉर्क शहर येथे काम केले.[]

प्रकाशने

संपादन

बाटलीवाला यांच्याकडे महिला सक्षमीकरण आणि विकासाच्या मुद्द्यांवर अनेक प्रकाशने आहेत. त्यांचे सर्वोत्कृष्ट पुस्तक वुमन एंपॉवरमेंट इन साउथ एशिया - कन्सेप्ट्स अँड प्रॅक्टिसेस (१९९३), जे २०हून अधिक भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक एक "वैचारिक चौकट आणि नियमावली" आहे. ज्याचा मोठ्या प्रमाणावर महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण पुस्तिका म्हणून वापर केला जातो. त्यांचे इतर महत्त्वाची प्रकाशित पुस्तके खालील प्रमाणे आहेत आहेत: स्टेटस ऑफ रुलर वुमेन इन कर्नाटक (१९९८)[] ट्रान्सनॅशनल सिव्हिल सोसायटी: ॲन इंट्रोडक्शन विथ लॉयड डेव्हिड ब्राउन (२००६)[] ग्रासरूट मुव्हमेंटस ॲज ग्लोबल ॲक्टर्स [] आणि फेमिनिस्ट लिडरशिप फॉर सोशल ट्रांसफॉरमेशन: क्लिअरींग द कन्सेप्चुअल क्लाऊड(२०११).[]

संदर्भग्रंथ

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "Srilatha Batliwala". Justassociates Organization. 2016-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 March 2016 रोजी पाहिले.
  2. ^ Sahay 1998, पान. 18.
  3. ^ "Are women's movements a force for change?". The Guardian. 5 March 2014. 8 March 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "Srilatha Batliwala". learningpartnership.org learningpartnership.org. 8 March 2016 रोजी पाहिले.
  5. ^ a b "Second Informal Thematic Debate Gender Equality and the Empowerment of Women:Srilatha Batliwala". United Nations General Assembly 61st session. 8 March 2016 रोजी पाहिले.
  6. ^ Batliwala & Brown 2006.
  7. ^ Batliwala 2011.