श्रीराम वि. साठे ( १९४६) हे मेकॅनिकल इंजिनियर असून मुंबई महापालिकेत नोकरीला होते. त्यातून २००४ साली निवृत्त झाल्यावर श्री.वि. साठे यांनी समग्र पेशवाईवर पुस्तक लिहिण्याचे ठरविले आणि सतत सात वर्षे अभ्यास करून ’पेशवे’ या नावाचा ग्रंथ (प्रकाशनदिवस : अक्षय्य तृतीया, १३मे २०१३- पृष्ठ संख्या मासिकाच्या पानाच्या आकारमानाची ७८० पृष्ठे.) साकार झाला.