श्रीरंगपट्टणमचा तह मैसूरचे राज्य आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, मराठा साम्राज्यहैदराबादचा निजाम यांच्यात मार्च १९, इ.स. १७९२ रोजी झालेला तह होता.

तिसरे इंग्रज-म्हैसूर युद्धात टिपू सुलतानचे मैसूरचे राज्य एकीकडे तर लॉर्ड कॉर्नवॉलिस (ईस्ट इंडिया कंपनी) आणि मराठा साम्राज्य आणि निझाम दुसरीकडे अशा फौजांनी भाग घेतला. दोन वर्षे चाललेल्या युद्धात फेब्रुवारी १७९२मध्ये टिपू सुलतानने पराभव मान्य केला व तह करण्याचे स्वीकारले. या तहातील कलमांनुसार टिपू सुलतानाने त्याचा अर्धा भूप्रदेश आणि तीन कोटी तीस लाख रुपये युद्धखंडणी (सोने व चांदीच्या रूपात) ब्रिटिशांना देण्याचे मान्य केले. या युद्धखंडणीपैकी अर्धी रक्कम त्वरीत व उरलेली अर्धी रक्कम तीन हप्त्यात द्यावी असे ठरले. या तहानुसार टिपूने सर्व ब्रिटिश युद्धकैद्यांची मुक्तता केली आणि तहाच्या अटींची पूर्तता होईपर्यंत स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलांना इंग्रजांकडे ओलीस ठेवले.

हा तह सहा वर्षे टिकला व चौथ्या इंग्रज-म्हैसूर युद्धानिशी तो रद्द ठरला.